छोट्या पडद्यावरील लोकप्रिय डान्सिंग शो सुपर डान्सरच्या चौथ्या सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या वीकेंडला सुपर डान्सर सीझन ४ मध्ये स्पर्धक नीतू कपूरच्या लोकप्रिय गाण्यांवर परफॉर्म करतील आणि आपल्या डान्स स्टाइलमधून या ज्येष्ठ अभिनेत्रीला मनाचा मुजरा करतील. स्पर्धक परी आणि तिचा सुपर गुरु पंकज थापा यांनी ‘छू कर मेरे मन को’ या नीतू कपूर यांच्या गाजलेल्या गाण्यावर परफॉर्म केले आणि आपल्या परफॉर्मन्सने सगळ्यांनाच थक्क करून सोडले. परीच्या त्या भावनाप्रधान परफॉर्मन्सने नितू कपूर अवाक झाली. इतके भावनाप्रधान गाणे या दोघांनी आपल्या परफॉर्मन्सने किती गोड केले हे पाहून तिला आश्चर्य वाटले. इतक्या कोवळ्या वयात परीचे अप्रतिम नृत्य कौशल्य पाहून नीतू कपूर यांनी एक आठवण सांगितली जेव्हा ती स्वतः पाच वर्षांची होती आणि सूरज चित्रपटासाठी तिने पहिला शॉट दिला होता. तो डोंगरावर पळत जाण्याचा शॉट तिला पुन्हा पुन्हा अख्खा दिवस द्यावा लागला होता आणि तिचे पाय सोलवटून गेले होते. यानंतर, शिल्पा शेट्टी कुंद्राने त्या दोघांच्या परफॉर्मन्सचे कौतुक केले, विशेषतः सुपर गुरु पंकजचे. तिने त्याला सांगितले की आजवरच्या त्याचा हा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स होता आणि तो पाहून ती खरोखर हेलावून गेली.
'सुपर डान्सर ४'मधील परीचा परफॉर्मन्स पाहून थक्क झाल्या नीतू कपूर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 11:06 PM