OMG! लग्नानंतर नेहा धूपियाला मिळालेत ६०० शिव्या-शाप देणारे संदेश!!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 08:46 AM2018-07-31T08:46:31+5:302018-07-31T08:49:58+5:30
अलीकडे एका मुलाखतीत नेहाने आपल्या या ‘सीक्रेट वेडिंग’चा संपूर्ण प्लान शेअर केला.
नेहा धूपिया आणि अंगद बेदीया दोघांनीही आपले लग्न ‘सीक्रेट’ ठेवले. या लग्नाबद्दल या कानाचे त्या कानाला कळणार नाही, इतकी गुप्तता पाळली गेली होती. अलीकडे एका मुलाखतीत नेहाने आपल्या या ‘सीक्रेट वेडिंग’चा संपूर्ण प्लान शेअर केला. लग्नानंतर नेहाने सोशल मीडियावर याची घोषणा केली, तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया धक्कादायक होत्या, असे नेहाने यावेळी सांगितले. ‘लग्न झाल्यानंतर मी इन्स्टाग्रामवर ही बातमी शेअर केली. काही वेळानंतर मी सहज म्हणून फोन चेक केला तर इन्स्टावर सुमारे ६०० मॅसेज पडले होते. पण हे शुभेच्छा संदेश नव्हते तर त्यात शिव्या होत्या. लोकांचा संताप होता,’ असे नेहाने सांगितले.
माझे ‘सीक्रेट वेडिंग’ अनेकांसाठी धक्कादायक होता. पण अंगद आधीपासूनचं क्लीअर होता. त्याला बॉयफ्रेन्ड-गर्लफ्रेन्ड हे नाते नको होते. लग्न करा वा मित्र बनून राहा, असे त्याचे स्पष्ट मत होते. आम्हा दोघांनाही लग्नाचा गाजावाजा करायचा नव्हता. त्यामुळे आम्ही लग्नाची बातमी शक्य तेवढी दडवून ठेवली, असेही तिने सांगितले.
नेहा व अंगदने गुपचूप लग्न केल्यानंतर अनेकांनी नेहा प्रेग्नंट असल्यामुळे तिने घाईघाईत लग्न उरकवले, असा अंदाज बांधला होता. पण नेहाच्या वडिलांनी आणि अंगदने या बातम्या धुडकावून लावल्या होत्या. लग्नाआधीच गरोदर झाल्यामुळं नेहानं घाईघाईनं लग्न केलं ही निव्वळ अफवा आहे. कुणाच्या ध्यानीमनी नसताना अचानक नेहाचं लग्न झाल्यामुळं लोक अशा चर्चा करत आहेत. त्यात काहीही तथ्य नाही,' असा खुलासा खुद्द अभिनेत्री नेहा धुपियाचे वडील प्रदीप धुपिया यांनी केला होता़ ज्येष्ठ क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांचा मुलगा म्हणजेच अंगद बेदी याने क्रिकेट विश्वात स्वत:ची अशी एक वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. दिल्लीच्या रणजी संघाकडून सुरुवातीला काही वर्ष क्रिकेट खेळणाऱ्या अंगदने त्यानंतर मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. रेमो डिसूझा दिग्दर्शित ‘फालतू’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याशिवाय ‘उंगली’, ‘पिंक’, ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटांतूनही तो झळकला होता.