नेहा कक्कर (Naha Kakkar) बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय गायिका आहे. तिने याद पिया की आने लगीपासून दिलबर यासारख्या कित्येक सुपरहिट गाण्यांना आवाज दिला आहे. प्रोफेशनल लाइफसोबत ती पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असते. मग ते बॉयफ्रेंड हिमांश कोहलीसोबतचे ब्रेकअप असेल किंवा रोहनप्रीत सिंगसोबतचे लग्न. नेहा आणि रोहनप्रीतने २४ ऑक्टोबर, २०२० मध्ये लग्न केले होते. आता लग्नाच्या तीन वर्षांनंतर त्यांच्या नात्यात कटुता आली आल्याचे बोलले जात आहे. कारण तिने ६ जूनला वाढदिवस साजरा केला. त्यावेळी त्या फोटोत रोहनप्रीत दिसला नाही.
नेहा कक्कर नेहमीच पती रोहनप्रीत सिंगसोबतचे 'हॅपी' फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ६ जून रोजी तिने तिचा वाढदिवस तिच्या पालकांच्या घरी साजरा केला. पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. मात्र रोहनप्रीत दिसला नाही. इतकेच नाही तर रोहनप्रीतने सोशल मीडियावरही नेहाला शुभेच्छा दिल्या नाहीत.
नेहाने पहिला वाढदिवस तिच्या कुटुंबियांसोबत साजरा केला. त्यानंतर मित्रांसोबतही सेलिब्रेशन केले. त्याने बरेच फोटो आणि व्हिडिओ शेअर केले, पण रोहनप्रीत कुठेच दिसत नव्हता. नेहाच्या पोस्टवर बहुतेक चाहत्यांनी 'रोहू कुठे आहे?' आणि 'नेहाचा नवरा कुठे आहे?' अशा कमेंट केल्या आहेत.