मुंबई – बॉलिवूडमधील गायिका नेहा कक्कड(Naha Kakkar) हिनं तिची स्वत:ची वेगळी ओळख बनवलेली आहे. कधी माता की चौकी गाणाऱ्या नेहानं तिच्या आयुष्यातील आधीचे दिवस कधी विसरली नाही. नेहाचं लहानपणीचं आयुष्य खडतरं राहिलं होतं. ४ वर्षाची असताना नेहानं बहिण सोनू कक्कडसोबत गाण्याला सुरुवात केली. आज अनेक लोक यशाच्या शिखरावर पोहचतात तेव्हा त्यांचे आधीचे आयुष्य विसरुन जातात. परंतु नेहाच्या बाबतीत तसं झालं नाही. नेहा नेहमी गरिबांची मदत करताना दिसून येते.
सध्या नेहा कक्कडचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती कारमध्ये बसून गरिबांना ५००-५०० रुपयांच्या नोटा वाटताना दिसतेय. नेहा पैसे वाटत असताना तिच्या गाडीच्या भोवती अनेक लोकं जमा होतात आणि गाडीला घेरतात. मास्क लावलेल्या नेहा कक्कडकडून पैसे घेण्यासाठी लोकं गोंधळ घालतात. ज्यामुळे नेहा घाबरते. त्यानंतर कारची काच वर घेत ती वाचण्याचा प्रयत्न करते परंतु लोकांचा गराडा पाहून ती मागे जाते आणि विंडो लावून त्याठिकाणाहून निघून जाते.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
नेहा कक्कडचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक जणांनी तिच्या कामाचं कौतुक केले तर काहींनी हा धोक्याचा प्रकार आहे असं म्हटलं. एकाने लिहिलं की, ५०० ची नोट देत असशील तर लोकं लाईन थोडी लावणार आहेत. तर एकाने या प्रकारावर चिंता व्यक्त केली. सेलिब्रिटीला अशाप्रकारे न करण्याचा सल्लाही काहींनी दिला. जर कुणाला या प्रकारात नुकसान झालं असतं तर? असंही काहींनी विचारलं आहे.
रश्मिका मंदाना हिच्या व्हिडीओची झाली आठवण
तर नेहा कक्कड हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एका सोशल मीडिया यूजरने म्हटलं की, अशाच एक व्हिडीओ अभिनेत्री रश्मिकाचा समोर आला होता. परंतु तिने पैसे दिले नव्हते. त्यावर काही लोकांनी कमेंट करत पैसे तरी द्यायचे असं म्हटलं आणि जेव्हा नेहा कक्कडचा व्हिडीओ पैसे देताना दिसत आहे त्यावर लोकं विरुद्ध कमेंट्स करत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर लोकं केवळ दुसऱ्यांना जज करण्यासाठी कमेंट्स करतायेत का? असाही प्रश्न निर्माण होतो.