नेहा कक्कर हनीमूननंतर कामावर परत आली आहे. सर्वांनाच माहीत आहे की, नेहाने तिच्या लाइफमध्ये खूप स्ट्रगल केला आहे. एकेकाळी ती जागरणात गात होती. आता देशातील टॉप गायिकांपैकी एक आहे. आपल्या आवाजासोबतच नेहा तिच्या हळव्या मनासाठीही ओळखली जाते. याची झलक पुन्हा एकदा 'इंडियन आयडॉल १२'च्या सेटवर बघायला मिळाली. या शोमध्ये नेहाने एका स्पर्धकाला १ लाख रूपयांची मदत केली आहे.
विशालनेही केली मदत
चॅनलने रिअॅलिटी शोचा प्रोमो शेअर केला आहे. ज्यात बघू शकता की, नेहा स्पर्धक शहजाद अलीची कहाणी ऐकून फारच इमोशनल झाली आहे. शहजाद हा जयपूरहून आला आहे. शहजादच्या कहाणीमुळे नेहा इतकी प्रभावित होते की, तिने त्याला १ लाख रूपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला. तसेच जज विशाल दादलानी यानेही शहजादला मदत करण्याचा निर्णय घेतला. (रोहन प्रीतसोबत पहिल्या भेटीबाबत केला नेहाने खुलासा, 'मी जेवढ्या मुलांना भेटले, रोहू सर्वात जास्त क्यूट आहे')
शहजादच्या आजीने कर्ज घेऊन पाठवलं मुंबईला
नेहाने शहजादला पैशांची मदत केली तर विशालने शहजादच्या ट्रेनिंगसाठी एक चांगला शिक्षक शोधण्याबाबत सांगितलं. शहजादने यावेळी नुसरत फतेह अली खान यांचं 'किन्ना सोना तेनू' हे गाणं गायलं होतं. सोबतच त्याच्या परिस्थितीबाबत सांगितलं होतं. तो एका छोटया कपड्याचा दुकानात काम करतो. त्याने सांगितलं की, बालपणीच त्याच्या आईचं निधन झालं होतं. त्यानंतर आजीनेच त्याला वाढवलं. तो म्हणाला की, त्याच्या आजीने ५ हजारांचं कर्ज घेतलं जेणेकरून तो मुंबईला येऊन 'इंडियन आयडॉल' मध्ये भाग घेऊ शकेल.