Join us

'नील आर्यनने तिरंगा उंचावला, पॅसिफीक युनिव्हर्सचा खिताब पटकावला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2023 4:35 PM

बिहारमधील सरहसा हे नील आर्यन ठाकूरचे मूळ गाव असून तो सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. त्याचे कुटुंबही पाटणा येथेच राहते

पाटणा - बिहारच्या सहरसा जिल्ह्यातील युवकाने आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव रोशन केलंय. नील आर्यन ठाकूरच्या स्टायलिश आणि सुंदरतेनं त्याने साता समुद्रापलिकडे आपलं नाव पोहोचवलं. मिस्टर पॅसिफिक युनिव्हर्स खिताब जिंकत नील आर्यनने अमेरिकेतील पेरू देशात तिरंगा फडकवला. नील आर्यन हे पॅसिफिक युनिव्हर्स हा खिताब मिळवणारे पहिले भारतीय आणि पिहिले आशियाई व्यक्ती ठरले आहेत. त्यामुळे, त्यांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतंय. तसेच, मॉडेलिंग क्षेत्रातूनही त्यांचं अभिनंदन करण्यात येतंय. 

बिहारमधील सरहसा हे नील आर्यन ठाकूरचे मूळ गाव असून तो सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. त्याचे कुटुंबही पाटणा येथेच राहते. यापूर्वीही त्याने अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवलं असून आता पेरू देशात स्वत:चं आणि देशाचं नाव रोशन केलंय. ३१ मे २०२३ च्या सकाळी भारतीयांसाठी ही आनंदाची बातमी झळकली. येथील स्पर्धेत नील आर्यन ठाकूरच्या नावाची पॅसिफिक युनिव्हर्स म्हणून घोषणा झाली. नील हा प्रोफेशनल मॉडेल असून सध्या मुंबईत राहतो. प्रोडक्ट डिझाईनमध्ये त्याने पदवी घेतली असून बिझनेस एडमिनिस्ट्रेशनमध्ये त्याने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. 

नील आर्यन अभिनेता म्हणूनही काम करतो, त्यासह कंटेंट क्रिएटरही आहे. देशातील सर्वच मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, या विचाराने प्रेरीत असून ते युनिसेफसह इतरही स्वयंसेवी संस्थांसोबत काम करतात. दरम्यान, यापूर्वी २०२२ मध्ये नीलने पुरुषांसाठीची भारतातील सर्वात मोठी समजली जाणारी स्पर्धा, रुबरू मिस्टर इंडियामध्ये सहभाग नोंदवला होता. विशेष म्हणजे प्रथम क्रमांकही मिळवला होता. तसेच, 'मॉडल ऑफ द ईयर ईस्ट २०२२' हा खिताबही त्याने जिंकला आहे. 

टॅग्स :बिहारमुंबईबॉलिवूड