अनेकदा वाढलेल्या वजनावरुन, काळ्या रंगावरुन खिल्ली उडवली जाते. पण, एखाद्या व्यक्तीला तो गोरा आहे, म्हणून टर उडवली गेल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? एका अभिनेत्याला त्याच्या त्वचेच्या रंगामुळे चिडवलं जायचं. याचा खुलासा खुद्द अभिनेत्यानं केला आहे. जास्त गोरा असल्यानं रंगावरुन खिल्ली उडवली जायची, असा खुलासा अभिनेत्यानं केला आहे.
तो अभिनेता आहे नील नितीन मुकेश (Neil Nitin Mukesh). अभिनेत्यानं नुकतंच 'हिंदी रश'ला मुलाखत दिली. यावेळी तो म्हणाला, मी शाळेत होतो, तेव्हा माझ्या रंगावरुन माझे मित्र मला चिडवायचे. मी खूप गोरा होता म्हणून मुलांना वाटायचं की मला त्वचारोग आहे. हे सर्व ऐकून मला खूप वाईट वाटायचं. पण, मला त्यांच्या विचारसरणीबद्दल आणि त्यांच्या संगोपनाबद्दल वाईट वाटतं. मी माझ्या मुलीला असं संगोपन कधीच करणार नाही".
पुढे नील म्हणाला, 'मला त्यावेळी वाईट वाटलं होतं, मी लहान होतो, मला समजत नव्हतं. पण जसे-जसे मी मोठे होत गेलो, तसे-तसे मला कळले की माझा फायदा काय आहे आणि त्यांचा तोटा काय आहे. कारण मी माझे व्यक्तिमत्व विकसित केलं आहे. की असा व्यक्ती आहे, जर तू म्हणालास की तू हे करू शकत नाहीस, तर मी ते करुनच दाखवेन". नील नितीन मुकेशच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो अलीकडेच ZEE5 च्या 'हिसाब बराबर'मध्ये दिसला होता.