Join us

रानू मंडलच्या नशिबी पुन्हा पूर्वीचेच दिवस? अ‍ॅटिट्युड दाखवणे पडले महाग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 11:48 IST

रानूच्या उद्धटपणाचे अनेक किस्से मध्यंतरी ऐकायला मिळाले होते.

ठळक मुद्देमीडियालाही ती अ‍ॅटिट्यूड दाखवताना दिसली होती. याचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता.

‘एक प्यार नगमा है’ या गाण्यामुळे रानू मंडल रातोरात स्टार बनली.  आपण कधी बॉलिवूडसाठी गाणी गाऊ हा विचार रानू मंडलने स्वप्नातही केला नसेल. पण पश्चिम बंगलाच्या रानाघाट रेल्वे स्टेशनवर गाणी गात भीक मागणा-या रानूचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि या व्हिडीओने रानू एका रात्रीत स्टार झाली. हिमेश रेशमियाने रानूला त्याच्या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली आणि रानू सगळ्यांच्या डोळ्यांत भरली. पण नियतीची चक्रे पुन्हा फिरली आणि रानू पुन्हा पूर्वीच्या आयुष्यात परतली. होय, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रानूला पुन्हा तिचे पूर्वीचे आयुष्य जगावे लागतेय.

अनेकांच्या मते, रानूचा उद्धटपणा याला कारणीभूत आहे.  रानूच्या उद्धटपणाचे अनेक किस्से मध्यंतरी ऐकायला मिळाले होते. तिचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. या व्हिडीओत रानू मंडल एका चाहतीवर रागावल्याचे दिसले होते.

‘डोन्ट टच मी, आय एम सेलिब्रेटी नाऊ’, असे चाहतीला तिने सुनावले होते. तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर  रानू मंडलच्या डोक्यात हवा गेल्याची चर्चा सुरू झाली होती. सोशल मीडिया युजर्सनीही यावरून तिच्यावर टीका केली होती.

मीडियालाही ती अ‍ॅटिट्यूड दाखवताना दिसली होती. याचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता.नेमका हाच उद्धटपणा, हेच वाटणे रानूच्या स्टारडमला घातक ठरले आणि चाहत्यांनी तिच्याकडे पाठ फिरवल्याचे बोलले जातेय. आता रानूकडे काहीही काम नसल्याचे कळतेय. काम नसल्याने रानू मीडियासमोर येण्यास टाळतेय. अशात पुन्हा एखादा हिमेश रेशमिया रानूला मदतीचा हात देतो का, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे. 

 

टॅग्स :राणू मंडल