Join us

'तुला इंटरेस्ट आहे का?' 'समलिंगी आहेस का' विचारणाऱ्याला करण जोहरचा उलटप्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 12:35 IST

Karan johar: करण जोहरने अलिकडेच थ्रेड या अँपवरुन चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाचं करणने थेट उत्तर दिलं.

बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर (karan johar) याचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या सिनेमात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. त्यामुळे सध्या या संपूर्ण सिनेमाची टीम चर्चेत आहे.  यामध्येच सध्या करण जोहरची एक प्रतिक्रिया चर्चेत येत आहे. एका चाहत्याने करणला तू समलैंगिक आहेस का? असा प्रश्न विचारला. त्यावर करणने दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे.

करण जोहरने अलिकडेच थ्रेड या अँपवरुन चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी त्याने एक सेशन ठेवलं होतं. यावेळी चाहत्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले. यात एकाने करणला थेट तू गे आहेस ना? असा खोचक प्रश्न विचारला. विशेष म्हणजे करणने या प्रश्नाचं सगळ्यांसमोर उत्तर दिलं.

काय म्हणाला करण?

'तू गे आहेस का?' असा प्रश्न विचारल्यावर  करणने 'You're interested?' असा उलटप्रश्न विचारला.  तुला इंटरेस्ट आहे का? असा प्रश्न करणने विचारल्यानंतर या नेटकऱ्याने पुन्हा त्याला काहीही रिप्लाय दिला नाही. मात्र, करणच्या या उत्तराची नेटकऱ्यांमध्ये कमालीची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, करण जोहरचा रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमात रणवीर आणि आलियासह धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आजमी यांसारखे दिग्गज कलाकारही स्क्रीन शेअर करणार आहेत. तसंच वरुण धवन, जान्हवी कपूर, सारा अली खान आणि अनन्या पांडे हे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत. हा सिनेमा येत्या २८ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :करण जोहरसेलिब्रिटीसिनेमाआलिया भटरणवीर सिंगधमेंद्रजया बच्चनशबाना आझमी