Join us

आईची साडी, लहान बहीणीचं स्वेटर घालून आली की काय,या लूकमुळे गायत्री दातार होते ट्रोल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 18:20 IST

तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.तिच्या सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या अदा पाहायला मिळतील.

सेलिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो. सध्या अशीच एक सेलिब्रेटी चर्चेत आली आहे. ती म्हणजे गायत्री दातार. 'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली महाराष्ट्राची लाडकी ईशा म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातार रसिकांच्या मनावर राज्य करतेय. तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात तिच्या चाहत्यांना रस असतो. गायत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून  चाहत्यांशी संपर्कात असते. तिचे हे नवनवीन प्रोजेक्ट व्हिडीओ आणि वेगवेगळ्या मूडमधील फोटो चाहत्यांसह शेअर करत वाहवा मिळवत असते. गायत्री ही बरीच स्टायलिश आहे. मात्र तिचा एक फोटो  पाहून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकीत झाल्याशिवाय राहणार नाही.

सेलिब्रेटी बऱ्याचदा  हटके फॅशन आणि स्टाइल चर्चेचा विषय बनते. अनेकदा त्याच्या कपड्यांवरून त्याची खिल्लीही उडवली जाते. असाच प्रकार गायत्रीबरोबरही घडल्याचे पाहायला मिळत आहे.एका पुरस्कार सोहळ्यात गायत्री दातारने लाल रंगाची साडी परिधान केली होती. या साडीवर तिने पांढरा कलरचा ब्लाऊज परिधान केला होता.

 

मात्र साडीच्या वर हा स्वेटरसारखा दिसणारा ब्लाऊजमुळे गायत्री ट्रोल झाली. नेहमीच अभिनेत्री त्यांच्या फॅशन स्टेटमेंटमध्ये विविध प्रयोग करत असतात. गायत्रीही दिवसेंदिवस फॅशनच्या बाबतीत सजग बनत चालली आहे. मात्र कधी कधी एक्सप्रिमेंट करणेही फसतं आणि अशा प्रकारे ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. 

या साडीमध्ये गायत्री सुंदर दिसत असली तरी विचित्र कॉम्बिनेशनमुळे साडीवर ते हवे तितके उठून दिसत नसल्याचे चाहत्यांना वाटले. त्यामुळे तिच्या या फोटोवर कमेंट्सद्वारे अनेकांनी या लूकसाठी पसंती दिली तरी काहींनी नापसंतीही दिल्याचे पाहायला मिळाले. 

तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.तिच्या सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या अदा पाहायला मिळतील. गायत्रीने केलेले बोल्ड फोटोशूटमधला अंदाज कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर गायत्रीचाही बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

 

टॅग्स :गायत्री दातार