Join us

'याचा अर्थ असा नाही तो तुमच्याशी लग्न करेल'; रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंडला नीतू कपूरचा टोमणा?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2023 4:38 PM

Neetu kapoor: नीतू कपूर यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये लग्न, रिलेशनशीप यावर भाष्य करण्यात आलं होतं.

बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत येणारा अभिनेता म्हणजे रणबीर कपूर(Ranbir kapoor). फिल्मी करिअरपेक्षा रणबीर त्याच्या लव्हअफेअरमुळे जास्त चर्चेत आला. १४ एप्रिल रोजी अभिनेत्री आलिया भट्टशी लग्न करणाऱ्या रणबीरने दीपिका पदुकोण, कतरिना कैफ यांसारख्या लोकप्रिय अभिनेत्रींना डेट केलं आहे. विशेष म्हणजे सध्या सोशल मीडियावर रणबीरची आई अभिनेत्री नीतू कपूर (neetu kapoor) यांनी एक पोस्ट केली आहे. या पोस्टचा संबंध नेटकरी कतरिना आणि दीपिकाशी जोडत असून नीतू यांनी या दोघींना टोमणा मारण्यासाठी त्या पोस्टचा वापर केल्याचं म्हटलं जात आहे.

शनिवारी नीतू कपूर यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये लग्न, रिलेशनशीप यावर भाष्य करण्यात आलं होतं. ही पोस्ट पाहिल्यावर अनेकांनी त्याचा संबंध कतरिना (katrina kaif), दीपिकासोबत (deepika padukone) जोडला आहे. नीतू यांनी मुद्दाम ही पोस्ट शेअर केल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे.

‘त्याने तुम्हाला 7 वर्षे डेट केलं म्हणून याचा अर्थ असा होत नाही की तो तुमच्याशी लग्न करेल. माझे काका 6 वर्षे मेडिसीन शिकले, पण आता ते डीजे आहेत’, असं नीतू कपूर यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी त्याचा संबंध कतरिना, दीपिकासोबत जोडला आहे. नीतू यांनी मुद्दाम ही पोस्ट शेअर केल्याचं अनेकांचं मत आहे.

दरम्यान, नीतू कपूर यांच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. रणबीर आणि कतरिना यांनी जवळपास ७ वर्ष एकमेकांना डेट केलं होतं. त्यामुळे हा टोमणा फक्त कतरिनासाठीच आहे असं म्हणत तिच्या चाहत्यांनी नीतूला सुनावलं आहे. कतरिना आणि रणबीर यांचं रिलेशन कलाविश्वात चांगलंच गाजलं होतं. कपूर कुटुंबातील अनेक पार्ट्यांमध्ये कतरिनाने हजेरी लावली होती त्यामुळे हे नातं कपूर कुटुंबालाही मान्य होतं अशी चर्चा होती. मात्र, या जोडीमध्ये काही कारणास्तव बिनसलं आणि ते वेगळे झाले. 

टॅग्स :नितू सिंगकतरिना कैफदीपिका पादुकोणरणबीर कपूरआलिया भटसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा