गेल्या काही दिवसांपासून एका बातमीने चांगलाच जोर धरलाय. ती म्हणजे 'तारक मेहता का उलटा चष्मा' (tarak mehta ka ooltah chashmah) मालिकेत दयाबेनची पुन्हा एन्ट्री. इतकंच नव्हे तर दयाबेनची भूमिका कोण साकारणार, याचाही खुलासा झाला. अभिनेत्री काजल पिसल दयाबेनची (kajal pisal) भूमिका साकारणा असल्याची चर्चा झाली.अशातच 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेत नवीन दयाबेन असणाऱ्या काजल पिसलने याविषयी मौन सोडलंय. काय म्हणाली काजल, जाणून घ्या
नवी दयाबेन असणारी काजलने व्यक्त केल्या भावना
एका मुलाखतीत 'तारक मेहता...'मधील नवी दयाबेन असणाऱ्या काजल पिसलने या सर्व अफवा असल्याचं म्हटलं आहे. अभिनेत्री म्हणाली की, "मी स्पष्ट सांगू इच्छिते की, तारक मेहता.. मालिकेत मी दयाबेन साकारणार या फक्त अफवा आहेत. यामध्ये कोणतंच तथ्य नाही. ज्या बातम्या लोकांसमोर येत आहेत त्या खोट्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो हा खूप जुना आहे."
"या अफवांमुळे मला लोकांचे अनेक फोन आणि मेसेज येत आहेत. पण या बातम्यांमध्ये कोणतीही सत्यता नाही. तुम्हा सर्वांना माहितीये की मी सध्या झनक या मालिकेत काम करतेय. त्यामुळे मी दयाबेन साकारतेय या बातम्या निव्वळ अफवा आहेत."
२०२२ मध्ये ऑडिशन दिली होती
काजल पिसलने सांगितलं की, "तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेत दयाबेनची भूमिका साकारण्यासाठी मी २०२२ मध्ये ऑडिशन दिली होती. त्यावेळचा फोटो आता सोशल मीडियावर फिरतोय. त्यामुळे कृपया कोणीही या अफवांवर विश्वास ठेऊ नका." त्यामुळे अजूनही नव्या दयाबेनसाठी मालिकेचे निर्माते असित मोदींचा शोध सुरु आहे, हेच सत्य आहे.