Join us  

अक्षयनं उडवली विकी-कतरिनाच्या लग्नाची खिल्ली, व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 10:43 AM

Akshay On Vicky Katrina Wedding: होय, अक्कीने कतरिना कैफ व विकी कौशलच्या ग्रॅण्ड वेडिंगवर  (Vicky Kaushal And Katrina Kaif Wedding ) अशी काही मजेदार प्रतिक्रिया दिली की, सगळ्यांनाच हसू अनावर झालं.

Akshay On Vicky Katrina Wedding:  बॉलिवूडचा ‘खिलाडी’अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा हजरतजबाबीपणा काय सांगावा. अनेकदा त्याचा प्रत्यय येतोय. अलीकडे कपिल शर्मा शोमध्येही अक्षयच्या याच स्वभावाचं दर्शन घडलं. होय, अक्कीने कतरिना कैफविकी कौशलच्या ग्रॅण्ड वेडिंगवर  (Vicky Kaushal And Katrina Kaif Wedding ) अशी काही मजेदार प्रतिक्रिया दिली की, सगळ्यांनाच हसू अनावर झालं. अक्षयसोबत या शोमध्ये हजर असलेली अभिनेत्री सारा अली खान ही सुद्धा तिचं हसू आवरू शकली नाही.

‘द कपिल शर्मा शो’चा (The Kapil Sharma Show ) एक नवा प्रोमो रिलीज झाला आहे आणि तो सध्या जाम चर्चेत आहे. अक्षय व सारा आपल्या ‘अतरंगी रे’  (Atrangi Re) या सिनेमाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये आलेले असताना अक्की कतरिना व विकीच्या लग्नावर विनोद करताना या प्रोमोमध्ये दिसतोय.

या व्हिडीओच्या सुरुवातीला अक्षय कुमार जादू दाखवताना दिसतो. तो काही मॅजिक ट्रिक्स दाखवतो. त्यानंतर कॉमेडियन किकू शारदाची एंट्री होते. ‘मी आत्ताच राजस्थानमधील एका हायप्रोफाइल लग्नाला हजेरी लावून आलो. एवढा भव्य लग्नसोहळा मी कधीच पाहिला नाही कारण त्यांनी मला पाहू दिलाच नाही. पण लग्न खूप छान पार पडलं,’असं किकू म्हणतो. यावर अक्षय कुमार  मोठी मजेशीर प्रतिक्रिया देतो. ‘त्या ठिकाणी तुम्ही किट-कॅटही खाल्लं असेल...,’असं तो म्हणतो.अक्षय कुमारचा हा जोक ऐकून तिथे उपस्थित असणा-या सर्वांनाच हसू येतं.  सारा अली खान तर जोरजोरात हसू लागते. 

विकी आणि कतरिना यांनी गेल्या 9 डिसेंबरला जयपूरमध्ये लग्नगाठ बांधली. हा शाही विवाह सोहळा सोशल मीडियावर बराच चर्चेत राहिला होता. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरलही झाले होते. लवकरच विकी व कतरिनाचा रिसेप्शन सोहळा होणार आहे आणि या रिसेप्शनला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. 

टॅग्स :अक्षय कुमारकतरिना कैफविकी कौशलद कपिल शर्मा शो