सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. त्याच्या निधनानंतर सुरूवातीला त्याने डिप्रेशनमुळे आत्महत्या केल्याचे बोलले जात होते. मुंबई पोलिसांच्या तपासात फासाने श्वास कोंडल्यामुळे त्याचे निधन झाल्याचे समोर आले होते. इतकेच नाही तर रिपोर्टमध्ये असेदेखील म्हटले गेले होते की, सुशांतच्या मृत्यू आधी त्याने गुगलवर पेनलेस डेथ म्हणजेच वेदनारहित मृत्यू सर्च केले होते. आता टाइम्स नाऊच्या रिपोर्ट्सनुसार, सुशांतने गुगलवर काही वेगळेच सर्च केले होते.
सुशांत मृत्यू प्रकरणी दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत. मागील रिपोर्ट्सनुसार, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले होते की सुशांतने गुगलवर पेनलेस डेथ म्हणजेच वेदनारहित मृत्यूबद्दल सर्च केले होते. मात्र लेटेस्ट रिपोर्ट्सनुसार, सुशांतने मृत्यूपूर्वी हिमाचल प्रदेश, केरळ आणि कुर्गमधील प्रॉपर्टी सर्च केली होती. ही माहिती टाइम्स नाऊला तपास करणाऱ्या एजेंसीच्या जवळच्या सूत्रांनी दिली आहे.
सुशांतचे पाय होते तुटलेले तर गळ्याभोवती सुईच्या खुणा, हॉस्पिटलमधील स्टाफचा खळबळजनक खुलासा
एका मुलाखतीत रियानेदेखील सांगितले आहे की सुशांत कुर्गला शिफ्ट होण्याचा विचार करत होता. त्याचे मित्र व कुटुंबातील लोकदेखील हे सांगत होते की तिला ऑर्गेनिक शेती करायचे प्लानिंग करत होता. या प्रकरणातील मुख्य साक्षीदारांचे स्टेटमेंट एकमेकांसोबत मॅचदेखील करत नाहीत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार तपास एजेंसी रिया सोबत मुख्य आरोपी आणि साक्षीदारांची लाई डिटेक्टर टेस्ट करू शकतात. सीबीआयने सिद्धार्थ पिठानी, नीरज आणि सॅम्युअल मिरांडासोबत कित्येक वेळा चौकशी केली आहे. पहिल्या दिवशी रियाची जवळपास दहा तास चौकशी केली होती. दुसऱ्या दिवशीदेखील तिला बोलवण्यात आले आहे.