करीना कपूर (Kareena Kapoor) बॉलिवूडची मेगा अभिनेत्री आहे. लग्न, मुलांच्या जन्मानंतरही तिच्या करिअरला ब्रेक लागलेला नाही. 'जब वी मेट'ची गीत असो किंवा 'कभी खुशी कभी गम'मधली पू करीनाने प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. आता ती ओटीटीवरही पदार्पण करत आहे. करीनाला दोन गोंडस मुलं आहेत तैमूर आणि जेह. हे दोघंही त्यांच्या क्युट लुक्समुळे कायम चर्चेत असतात. तैमुर आणि जेहने त्यांच्या 'नॅनी' संदर्भात एक महत्वाचा नियम बनवला. तो काय आहे याचा खुलासा करीनाने केला आहे.
करीना कपूरच्या दोन्ही मुलांना कायम त्यांच्या 'नॅनी'सोबत बघितलं गेलं आहे. करीना आणि सैफ दोघंही जेव्हा कामावर जातात तेव्हा दोन्ही मुलांची पूर्ण जबाबदारी या नॅनींची असते. तैमुर आणि जेहमुळे या नॅनीही प्रसिद्ध झाल्या आहेत. पापाराझींसमोर या नॅनी देखील मुलांबरोबर कॅमेऱ्यात कैद होत असतात. नुकतंच करीनाने एक खुलासा केला. ती म्हणाली, 'सुरुवातीला जेह आणि तैमुरची नॅनी सगळ्यांसोबतच जेवायला बसायची. फक्त ते वेगळ्या डायनिंग टेबलवर बसायचे. हे बघताच तैमुर आणि जेह दोघंही गोंधळात पडले. ते आपल्या टेबलवर का बसले नाहीत असं दोघांनी विचारलं. नंतर दोघांनी नॅनींना आमच्यासोबत बसायची विनंती केली. तेव्हापासून कुटुंबात नवा नियम सुरु झाला आणि आता आम्ही सर्व एकसाथ बसून जेवतो.'
करीना कपूर लवकरच 'जाने जान' सिनेमात दिसणार आहे. नेटफ्लिक्सवर सिनेमा प्रदर्शित होतोय. हे तिचं ओटीटीवर पदार्पण असणार आहे. हा सिनेमा मर्डर मिस्ट्रीवर आधारित आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. सिनेमात विजय वर्मा आणि जयदीप पहलावत यांचीही मुख्य भूमिका आहे.