Join us

आयुषमान खुरानाच्या आवाजातील 'बधाई हो' सिनेमातील नवे गाणे प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2018 3:38 PM

बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाचा आगामी चित्रपट 'बधाई हो' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ठळक मुद्दे‘बधाई हो’ चित्रपट १९ आॅक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला'नैना ना जुडे'ला स्वरसाज दिला आयुषमान खुराना व नेहा कक्करने

बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाचा आगामी चित्रपट 'बधाई हो' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आयुषमानसह सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. या ट्रेलरला काही दिवसांतच तब्बल १० मिलियन लोकांनी पाहिले आहे. आता या चित्रपटातील एक नवे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.  'नैना ना जुडे' असे या गाण्याचे बोल आहेत. 

'बधाई हो'  ट्रेलरनंतर चित्रपटातील 'बधाईयां तेनु' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. या गाण्यालादेखील प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर 'मोरनी बनके' हे गाणे सोशल मीडियावर वायरल झाले होते. या गाण्याला पंजाबी गायक गुरू रंधावा व नेहा कक्कर यांनी स्वरसाज दिला आहे. हे गाणे एका सोहळ्यात चित्रीत करण्यात आले आहे. आता या चित्रपटातील आणखी एक नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. 'नैना ना जुडे' असे या गाण्याचे बोल असून हे गाणे स्वतः आयुषमानने गायले आहे. आयुष्मान आणि नेहा कक्कर या गायकांनी गाण्याला स्वरसाज दिला आहे. आता हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल का हे पाहावे लागेल. 

जंगली पिक्चर्स आणि क्रोम पिक्चर्सच्या बॅनरखालील विनित जैन, अलिया सेन, हेमंत भंडारी आणि अमित शर्मा यांची निर्मिती असलेल्या ‘बधाई हो’ हा चित्रपट १९ आॅक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अमित रवींद्रनाथ शर्मा दिग्दर्शक असून, आयुष्यमान आणि नीना गुप्ता यांच्याबरोबरच सान्या मल्होत्राही झळकत आहे. विनोदी धाटणीचा कौटुंबिक चित्रपट म्हणून प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहे.

टॅग्स :बधाई होआयुषमान खुराणासान्या मल्होत्रानेहा कक्कर