झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस, निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. राणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. प्रेक्षकांचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेने नुकताच ६०० भागांचा टप्पा पार केला. या मालिकेतील सर्व व्यक्तिरेखा महाराष्ट्रातील घराघरात पोहोचल्या आहेत आणि त्या तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत.
या मालिकेतील अंजली आणि राणा नव्हेच तर बरकत, नंदिता वहिनी, चंदे हि सगळी पात्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहेत. या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजनच नाही केलं तर कुस्ती या खेळाचं महत्व देखील दर्शवलं. अंजली आणि राणा यांची हृदयस्पर्शी प्रेमकथा, कठीण परिस्थितीत न डगमगता, एकमेकांच्या साथीने प्रत्येक अडचणीला सामोरं जाण्याची दोघांची वृत्ती प्रेक्षकांना भावली. लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या या मलिकने प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्याने मैलाचा दगड पार पडला आहे.
नुकतंच तुझ्याज जीव रंगला या मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं की, अंजलीचं नाव आबासाहेब सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी पुढे करतात. या निवडणुकीसाठी नंदिताला उभं राहायचं पण घरातील सगळ्यांचा आणि गावकऱ्यांचा पाठिंबा हा अंजलीलाच मिळतोय हे पाहून नंदिता अजून चिडते आणि अपक्ष राहून निवडणुकीला उभं राहायचा निर्णय घेते. त्यात ती राणाकडून फक्त तिलाच पाठिंबा द्यायचं वचन देखील घेते. राणा वचनबद्ध असल्यामुळे उघड उघडपणे अंजलीला पाठींबा देऊ शकत नाही आहे, म्हणून तो आणि बरकत मिळून रात्रीच्यावेळी गावच्या भिंतींवर अंजलीच्या प्रचाराचे पोस्टर चिटकवत आहेत. राणा हे सगळं अंजलीचा शुभचिंतक म्हणून करतोय. पण अंजलीला कळेल का की, तिचा हा हितचिंतक कोण आहे ते? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मालिका पाहायल्यावरच कळेल.
तुझ्यात जीव रंगला या मालिकेत अक्षया देवधर, हार्दिक जोशी या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. ही मालिका प्रेक्षकांना सोमवर ते शनिवार संध्याकाळी ७.३० वाजता झी मराठीवर पाहायला मिळते.