Join us

'वागले कि दुनिया' मालिकेत नवा ट्विस्ट, वागले कुटुंबातील व्यक्ती बेपत्ता होणार; सुमीत राघवन म्हणतो- योग्‍यवेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 15:53 IST

'वागले कि दुनिया' मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. सध्या या मालिकेचं कथानक रंजक वळणावर आलं आहे.

गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत असताना, सोनी सब वाहिनीवरील लोकप्रिय मालिका- 'वागले कि दुनिया' आणि पुष्पा इम्पॉसिबल मधील प्रेक्षकांच्या आवडत्या व्यक्तिरेखा १२ आणि १३ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता एकत्र येणार आहेत. या एपिसोड्समध्‍ये दोन्‍ही मालिकांमधील प्रमुख पात्रांचा समावेश असेल आणि दोन्‍ही मालिकांचे कथानक एका रंजक वळणावर येऊन ठेपलेलं प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 

'वागले की दुनिया'मधील किट्टू बोरीवली स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गणपती मंडळाचे पारितोषिक जिंकण्यासाठी उत्सुक असताना, 'पुष्पा इम्पॉसिबल'मधील विशेष मुलगा गोलू त्याचे वडील महेंद्र यांनी त्याला स्वतःची गणेशमूर्ती नाकारल्याने बेपत्ता होतो. चाळीतून बाहेर पडल्‍यानंतर गोलू गजबजलेल्या शहरात आपसूक हरवून जातो आणि चुकून वागले राहत असलेल्या साई दर्शन सोसायटीत प्रवेश करतो.

दुसरीकडे, अल्झायमरने ग्रस्त वृद्ध राधिका वागले कॉलनीबाहेरच्या परिसरात भरकटून जाते. हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी चिंतित व घाईत असलेले वागले आणि 'पुष्पा इम्पॉसिबल'चे कलाकार यांचा गणेश चतुर्थीच्या शुभप्रसंगी एकमेकांच्या समोर येणार आहेत. गणपती बाप्‍पाच्‍या आशीर्वादासह ते गोलू व राधिकाचा शोध घेण्‍यामध्‍ये यशस्‍वी होतील का? दोन्‍ही कुटुंबांच्‍या नशीबात पुढे काय घडणार? 

राजेश वागलेची भूमिका साकारणारा सुमीत राघवन म्‍हणाला, ‘’या रहस्‍यमय घटना अगदी योग्‍य वेळी घडल्‍या आहेत. मालिका ‘पुष्‍पा इम्‍पॉसिबल’च्‍या टीमसोबत शूटिंग करण्‍याचा अनुभव आम्‍हा सर्वांसाठी उत्‍साहवर्धक होता. गणेश चतुर्थी उत्‍सवामध्‍ये वागले व पटेल यांच्‍यामधील दिसून येणारे हे नवीन नाते दोन्‍ही मालिकांच्‍या चाहत्‍यांसमोर सादर करण्‍यासाठी आम्‍ही खूप उत्‍सुक आहोत.

टॅग्स :सुमीत राघवनसेलिब्रिटी