Join us

'सुखाच्या सरींनी हे मन बावरे'मध्ये अनुच्या निर्णयाने टळणार अनर्थ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 3:10 PM

सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेमध्ये सिद्धार्थने अनुला लग्नाची मागणी घातल्यानंतर अनुचे त्यावर उत्तर काय असेल हे जाणून घेण्यासाठी सिद्धार्थ खूपच आतुर होता. 

सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेमध्ये सिद्धार्थने अनुला लग्नाची मागणी घातल्यानंतर अनुचे त्यावर उत्तर काय असेल हे जाणून घेण्यासाठी सिद्धार्थ खूपच आतुर होता. परंतु अनुने सिद्धार्थला नकार दिला आणि सगळी समीकरणच बदलली. ज्या क्षणाचे स्वप्न सिद्धार्थ खूप महिन्यांनपासून बघत होता ते क्षणार्धात तुटले. या घडल्या प्रकारावरून दुर्गा सिद्धार्थला बरच ऐकवते आणि सान्वी सोबत लग्न करण्यास मनवते. अनुने दिलेल्या नकाराने दुखावलेला सिद्धार्थ त्याक्षणी मनाविरुध्द कठोर निर्णय घेतो. परंतु साखरपुड्याच्या दिवशी तिकडे अनु येते आणि सगळे चित्र बदलते. या सगळ्या घडामोडी मध्ये आता मालिका रंजक वळणावर येऊन पोहचली आहे कारण आता मालिकेत सिद्धार्थचा अपघात होणार आहे. अशा अवस्थेत सिद्धार्थ फक्त अनुचे नाव घेत आहे आणि त्यासाठीच दुर्गा अनुच्या घरी जाते. हे जे काही घडले आहे त्याला दुर्गा अनुला जबाबदार ठरवते. दुर्गा अनुला दिलेल्या सगळ्या अटी मागे घेते, कारण दुर्गाला सिद्धार्थपेक्षा मोठे काहीच नाही त्याच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे, असे सांगून तिच्यासमोर पदर पसरते. अनु सिद्धार्थला भेटायला येईल ? या अपघाताने अनु आणि सिद्धार्थच्या नात्यात कोणता बदल येईल ? अनुच्या निर्णयाने अखेर अनर्थ टळेल ?  हे बघणे रंजक असणार आहे.

आता मालिकेमध्ये सिद्धार्थला दुर्गाच्या कटकारस्थानांविषयी कळते. दुर्गाने अनु आणि सिद्धार्थला दूर ठेवण्यासाठी हि सगळी खेळी रचली आणि तो हे सत्य कळल्यावर सान्वीसोबतच्या लग्नाचा निर्णय मागे घेतो. सिद्धार्थने लग्नासाठी दिलेला नकार सान्विला कळतो आणि ती सिद्धार्थला बजावते कि तो असे नाही करू शकत. सिद्धार्थ मात्र त्याच्या निर्णयावर ठाम असून दुर्गाला सांगतो कि, सान्विला या घरातून जाण्यास सांगतो आणि तिथून निघून जातो.

  प्रेमामध्ये कठीण परीक्षा द्याव्या लागतात हे खर आहे.  पण यानंतर सिद्धार्थ आणि अनु त्यांच्या समोर येणाऱ्या परीक्षांना एकत्र कसे सामोरे जातील ? दुर्गाची कारस्थान कधी संपतील ? अनु सिद्धार्थचे प्रेम स्वीकारेल ? हे प्रेक्षकांना लवकरच कळेल.

टॅग्स :मृणाल दुसानीसकलर्स मराठीहे मन बावरेहे मन बावरे