Join us

जुन्या कथानकालाच नवी फोडणी

By admin | Published: October 17, 2015 1:21 AM

प्यार का पंचनामा हा चित्रपट २०११ मध्ये रिलीज झाला होता. सिक्वेलच्या रूपात आता रिलीज झालेला प्यार का पंचनामा हा चित्रपट सिक्वल नव्हे, तर रिमेक वाटतो

प्यार का पंचनामा हा चित्रपट २०११ मध्ये रिलीज झाला होता. सिक्वेलच्या रूपात आता रिलीज झालेला प्यार का पंचनामा हा चित्रपट सिक्वल नव्हे, तर रिमेक वाटतो. कारण, यात कथेचा विस्तार दिसून येत नाही, तर जुन्या कथेलाच पुन्हा फोडणी दिली आहे.दिल्लीच्या तीन तरुणांची कथा यात आहे. जे एका फ्लॅटमध्ये राहत आहेत. अंशुल (कार्तिक आर्यन), तरुण (ओंकार कपूर) आणि सिद्धार्थ (सनी सिंह) हे गर्लफे्रंडच्या शोधात आहेत. अंशुलला रुचिका (नुसरत बरुचा), तरुणला कुसुम (इशिता राज) आणि सिद्धार्थला सुप्रिया (सोनल सहगल) या प्रेयसी मिळतात. त्यामुळे हे तिघेही आनंदात असतात; पण त्यांचा आनंद फार काळ टिकत नाही. त्याला कारणेही तशीच आहेत. रुचिकाला अंशुलपेक्षा आपल्या बेस्ट फे्रंडची काळजी आहे, तर पैशांच्या कारणांवरून कुसुम आणि तरुणचे पटत नाही. सुप्रियाला आई-वडिलांना खूश ठेवायचे आहे, त्यात सिद्धार्थची लव्ह स्टोरी ट्रॅकवरून बाजूला सरकते. या तिघांनाही ही खात्री पटते की, गर्लफे्रंडसोबत रिलेशन हँडल करणे सोपे नाही.उणिवा : दिग्दर्शक लव रंजन यांनी सर्वात मोठी चूक ही केली आहे की, जुन्या कथानकालाच ते रंगवत आहेत. तेच पात्र, तीच स्टोरी आणि तेच ते सीन, जे की यापूर्वीच्या चित्रपटात दिसले आहेत. तीन लव्ह स्टोरींना एकाच वेळी हाताळण्यात लव रंजन यांची टीम कमी पडली आहे. त्यामुळे अनेकदा चित्रपट भरकटताना दिसतो. वास्तवतेपासून दूर जातो. चित्रपटाचे संगीतही प्रेक्षकांना खिळवून ठेवू शकत नाही. लक्षात राहण्यासारखे एकही गाणे नाही.वैशिष्ट्येचित्रपटाचे संवाद ही जमेची बाजू आहे. निश्चितच या संवादांना टाळ्या मिळतात. रोमान्सच्या नावावर मात्र हॉट सीन भरपूर आहेत. परफॉर्मन्सचे म्हणाल तर सनी सिंह बाजी मारून गेला आहे. इशिता राजचा अभिनयही चांगला वाटतो. नुसरत ओव्हर अ‍ॅक्टिंगची शिकार झाली आहे.का पाहावा?उत्कृष्ट संवाद, रोमान्स आणि हॉट सीन पसंत करणाऱ्यांनी पाहायला हरकत नाही.का पाहू नये?सिक्वेलच्या नावावर जुन्याच चित्रपटाची कथा आहे. यात नवे असे काहीच नाही.