सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीरमध्ये रंगणार न्यू ईयर स्पेशल भाग !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 07:15 AM2018-12-29T07:15:00+5:302018-12-29T07:15:00+5:30

कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर कार्यक्रमातील आपल्या सगळ्यांचे लाडके सुरवीर नव्या वर्षाचे स्वागत करण्यास सज्ज आहेत.

New Year Special episode will be in sur nava dhyass nava | सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीरमध्ये रंगणार न्यू ईयर स्पेशल भाग !

सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीरमध्ये रंगणार न्यू ईयर स्पेशल भाग !

googlenewsNext
ठळक मुद्देहर्षद नायबळ म्हणजेच मॉनिटर बनणार आहे “DJ” व्यक्ती कि वल्ली या चित्रपटाची टीम मंचावर येणार आहे

कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर कार्यक्रमातील आपल्या सगळ्यांचे लाडके सुरवीर नव्या वर्षाचे स्वागत करण्यास सज्ज आहेत. त्यांच्या सुरेल गाण्यांनी हे सुरवीर नव्या वर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला एक सुरेल, सुरेख नजराणा देणार आहेत. या खास भागाचे विशेष म्हणजे या भागामध्ये एलीमनेटेड स्पर्धक देखील सहभागी होऊन कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढवणार आहेत... आपल्या सगळ्यांचा लाडका हर्षद नायबळ म्हणजेच मॉनिटर बनणार आहे “DJ” ... या विशेष आठवड्याच्या भागामध्ये म्हणजेच १ आणि २ जानेवारीला भाई – व्यक्ती कि वल्ली या चित्रपटाची टीम मंचावर येणार आहे... महेश मांजरेकर, सुनील बर्वे, इरावती हर्षे, विद्याधर जोशी, सचिन खेडेकर आणि सागर देशमुख... तेव्हा येऊ घातलेल्या नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा आपल्या लाडक्या छोट्या सुरवीरांसोबत ३१ डिसेंबरला रात्री ९.३० पासून ... तसेच भाई – व्यक्ती कि वल्ली चित्रपटाच्या टीमसोबत विशेष  भाग बघायला विसरू नका १ आणि २ जानेवारी रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

 या न्यू ईयर स्पेशल भागामध्ये गाणी तर रंगणारच आहेत पण, काही हटके पारितोषिक देखील देण्यात येणार आहेत. सर्वोत्कृष्ट पालक पुरस्कार, पालकांचे पालक पुरस्कार, लेट लतीफ पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पीजे मार खा पुरस्कार, नखरेल ड्रामा क्वीन पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हावभाव पुरस्कार शक्तिमान पुरस्कार. आता या पुरस्कारांचे मानकरी कोण ठरणार हे तुम्हाला ३१ डिसेंबरच्या भागामध्ये कळणारच आहे. तसेच या भागामध्ये स्पर्धकांनी एका पेक्षा एक गाणी सादर केली आहेत. सई जोशीने लाल पैठणी रंग माझ्या, अंशिका चोणकरने इथेच टाका तंबू, मीराने वैकुंठाच्या राया हे नाट्यसंगीत सादर केले आहे, उत्कर्ष वानखेडे याने लाल इश्क हे गाणे सादर केले, चैतन्य देवढेने हे राजे आणि अभी मुझमे कही हे गाणे सादर केले. तसेच या भागाची रंगत अजूनच वाढणार आहे कारण, या भागामध्ये येणार आहेत एलिमनेटेड स्पर्धक ज्यांचे स्वागत सृष्टी पगारे हीने केले. तर मॉनिटरने या भागामध्ये DJ बनून काही औरच मज्जा आणली.
 

या विशेष आठवड्याच्या भागामध्ये म्हणजेच १ आणि २ जानेवारीला भाई – व्यक्ती कि वल्ली या चित्रपटाची टीम येणार आहे. महेश मांजरेकर, सुनील बर्वे, इरावती हर्षे, विद्याधर जोशी, सचिन खेडेकर आणि सागर देशमुख. छोट्या सुरवीरांनी या भागामध्ये पु.ल.देशपांडे यांच्याशी निगडीत गाणी सादर केली आहेत. तसेच स्वराली हिने सादर केलेले इरावती हर्षे यांच्या कासव चित्रपटातील लेहरे समंदर हे गाणे ऐकून त्या भावूक झाल्या. या भागामध्ये मॉनिटर मावळा बनला असून त्याने मंचावर बरीच धम्माल मस्ती केली. तसेच महेश मांजरेकर आणि सुनील बर्वे यांनी सादर केलेल्या गाण्याने कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढवली.

Web Title: New Year Special episode will be in sur nava dhyass nava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.