बिग बॉसच्या घरातून या वेळी नवीन प्रकाशने प्रेक्षकांचा निरोप घेतला. नवीनला प्रेक्षकांची मते न मिळाल्यामुळे त्याला बाहेर पडावे लागले. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्याला 500-1000च्या नोटा बंद झाल्या असल्याचे कळले, हे कळताच त्याला चांगलाच धक्का बसला आहे. नवीन सांगतो. बिग बॉसच्या घरात असताना बाहेरच्या जगात काय सुरू आहे, याची आम्हाला काहीच कल्पना नसते. घरातून बाहेर पडल्यानंतर आता मला नोटा रद्द झाल्याचे कळले. घरातील स्पर्धकांना तर याची काहीच कल्पना नाहीये. त्यांना तर याचा चांगलाच धक्का बसणार आहे. मी एक सामान्य माणूस असल्याने बिग बॉसच्या घरात कधी जाईन, असे मला वाटलेच नव्हते. मी खरे तर बिग बॉसचे सुरुवातीचे कोणतेही पर्व पाहिलेले नाही. मी एका क्लासमध्ये शिकवतो, तिथल्या मुलांनी आॅडिशनसाठी माझा फॉर्म भरला आणि माझे भाग्य चांगले असल्याने माझी निवड झाली. मला घरात जाताना काही तयारी करायलादेखील वेळ मिळाला नाही. मला घरात जाण्यासाठी माझी नोकरीदेखील सोडावी लागली. पण या घरात मला खूप चांगला अनुभव आला आणि खूप काही शिकायला मिळाले. बिग बॉसच्या घरात आपल्या लोकांच्या संपर्कात न राहता दिवस काढणे हे खूप कठीण होते. बिग बॉसच्या घरात असताना माझ्या घरातले लोक कसे असतील, याची मला चिंता लागलेली असायची. बिग बॉसमध्ये अनेक जण जिंकायचेच आहे, असे ठरवूनच आलेले आहेत, असे मला वाटते. घरात मन्नू, बाणी हे केवळ जिंकण्यासाठी खेळ खेळत आहे. तर करणदेखील शांत राहून खेळ खेळत आहे. पण या सगळ्यांपेक्षा गौरव चोप्रा जिंकावा, अशी माझी स्वत:ची इच्छा आहे. या कार्यक्रमाने मोनालिसा, लोपमुद्रा, प्रियांका असे मला चांगले फ्रेंड्स दिले आहेत. एका टास्कच्यावेळी नुकतीच माझ्या उजव्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे आता मला उपचार घेणे गरजेचे आहे. माझा हात बरा झाल्यावर पुढे काय करायचे ते मी ठरवेन. मी माझ्या शिक्षकीपेशाकडे पुन्हा वळेल किंवा कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करेन. मला काही आॅफर्स येत आहेत का, याची मी आतुरतेने पाहतोय़
नवीनला मिळाला नोटाबदलाचा धक्का
By admin | Published: November 14, 2016 3:32 AM