Join us

नववधू सना खानच्या वेडिंग लूकने वेधले लक्ष, जाणून घ्या लाल लेहंग्याची किंमत आणि खासियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 06:00 IST

सना खानने ग्लॅमर इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय देत सर्वांना जोरदार धक्का दिला होता. मानवतेची सेवा करण्यासाठी आणि अल्लाहच्या मार्गाचे अनुसरण करण्यासाठी ग्लॅमर दुनिया सोडत असल्याचे तिने जाहिर केले होते.

सनाने मौलाना मुफ्ती अनस यांच्याशी निकाह केला आहे. विशेष म्हणजे निकाह केल्यानंतर सनाने तिचे सोशल मीडियावर नावदेखील बदलले आहे. सनाने निकाह झाल्यानंतर तिच्या नवऱ्यासोबत एक फोटो शेअर केला होता. सोशल मीडियावर आपले नाव बदलून आता सय्यद सना खान असे केले आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली नववधू सना खान तिच्या वेडींग लूकमुळेही चर्चेत आहे. यावेळी सना खानने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. सनाच्या वेडींग लेहंग्यानेच सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतले आहे. लेहंग्यामुळे तिच्या सौंदर्यांलाही चारचाँद लागले आहेत.

लग्नात सनाने परिधान केलेल्या लहेंग्याची किंमत जवळजवळ एक लाख रुपये आहे. डिझायनर पूनम्स कॉर्चर ब्रॅण्डचा लहेंगा तिने निवडला होता. याची किंमत 1350 डॉलर म्हणजेच 99 हजार 879 रुपये इतकी आहे. या लहेंग्यावर हेवी गोल्डन एम्ब्रॉयडरी आहे.

सध्या सोशल मीडियावर साराने तिच्या वेडींग स्टाइलने साऱ्यांवर मोहिनी घातली आहे. मेहंदी पासून ते लग्नापर्यंत  सनाच्या स्टाईलने साऱ्यांनाच घायाळ केले आहे. या फोटोंमध्ये नववधू सना खानचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे. नवदाम्पत्याच्या विविध अदा, लग्नातील धम्माल मस्ती सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये पाहायला मिळतेय.

सना खानने ग्लॅमर इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय देत सर्वांना जोरदार धक्का दिला होता. मानवतेची सेवा करण्यासाठी आणि अल्लाहच्या मार्गाचे अनुसरण करण्यासाठी ग्लॅमर दुनिया सोडत असल्याचे तिने जाहिर केले होते. सना खान ही अभिनेत्री बिग बॉस 6 दरम्यान चर्चेत आली होती.

2005 मध्ये 'यही है हाय सोसायटी' या चित्रपटातून तिने अभिनयाची कारकिर्द सुरु केली होती. यानंतर हिंदी, मल्याळम, तामिळ, तेलगू, कन्नड अशा भाषेतील अनेक सिनेमे तिने केलेत. बिग बॉस आणि फिअर फॅक्टर या शोमध्ये सुद्धा ती झळकली होती. 

सना खानने शेअर केला ‘निकाह’नंतरचा पहिला फोटो, म्हणून मुफ्ती अनससोबत केला ‘निकाह’

आज मी घोषणा करते की, आजपासून मी बॉलिवूड इंडस्ट्रीतील आयुष्य सोडून मानवता आणि अल्लाहच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेते आहे. माझ्या सर्व बहिण-भावांना विनंती करते की, यापुढे इंडस्ट्रीतील कोणत्याही गोष्टीसाठी मला निमंत्रण देऊ नये. खूप खूप आभार,’असे लिहित तिने आपला निर्णय जगाला कळवला होता. 

टॅग्स :सना खान