Join us  

Vicky Kaushal Katrina Kaif House: नवीन घरात शिफ्ट होणार कपल, समोर आला आलिशान फ्लॅटचा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 4:03 PM

Vicky Kaushal Katrina Kaif New Sea Facing House:जुहू परिसरात असलेल्या स्वप्नवत आलिशान घरात त्यांच्या संसाराला सुरुवात करणार आहेत.

ट्रेंडिंग कपल कतरिना कैफ(Vicky Kaushal ) आणि विकी कौशल (Katrina Kaif)  लग्नाआधीही प्रचंड चर्चेत होते आता लग्नानंतरही तितकेच चर्चेत आहेत. हे क्यूट कपल लग्नानंतर मालदीव्हजला हनीमूनला जाणार अशी चर्चा होती. मात्र सध्या तरी दोघे हनीमूनला जाणार नाही. आधी दोघेही त्यांची सगळी रखडलेली कामं पूर्ण करतील. कामं पूर्ण झाल्यानंतरच हनीमूनला रवाना होणार असल्याचे बोललं जातंय. लग्नानंतर दोघेही मुंबईत पोहचले असल्याचेही समजतंय.

सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाची प्रचंड चर्चा रंगली होती. लग्नाच्या फोटोंनी तर अक्षरक्षः धुमाकुळ घातला होता. लग्नाच्या फोटोनंतर हळदी कार्यक्रमातले फोटोही व्हायरल झाले आहेत. याच पाठोपाठ आता विकी- कतरिना यांच्या नवीन घराचा व्हिडीओही समोर आला आहे. विकी-कतरिना त्यांच्या या नवीन घरातच त्यांच्या संसाराला सुरुवात करणार असल्याचे समजतंय.

 

 

विकी कतरिना जुहू परिसरात सी-फेसिंग व्हयु असलेल्या स्वप्नवत आलिशान घरात त्यांच्या संसाराला सुरुवात करणार आहेत.या दोघांनी मुंबईत येण्याआधीच्या त्यांच्या या घराचे सगळी कामं पूर्ण करण्यात आली आहेत. रात्री उशीरा पर्यंत ही कामं सुरु होती. नवदाम्पत्याच्या स्वागतासाठी खास तयारीही करण्यात आली आहे. ज्या फ्लॅटमध्ये विकी आणि कतरिना राहायला जाणार आहेत तो फ्लॅट अनुष्का आणि विराट यांच्या शेजारीच आहे. त्यामुळे आता दोघेही अनुष्का विराटचे नवीन शेजारी बनणार आहेत. 

पण तुम्हाला माहिती आहे का ? कोट्यवधी कमावणारी कतरिनाचे मुंबईत स्वःतचे घर नव्हते. ती भाड्याच्या घरात राहत होती. सुरुवातीच्या काळात कॅट वांद्रे इथल्या गुलदेव सागर अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला होती. २०१४ साली ती त्यावेळचा बॉयफ्रेंडरणबीर कपूरसह कार्टर रोडच्या सिल्वर सेंड अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होती. मात्र दोघांचं ब्रेकअप झालं. तरीही काही काळ कॅट त्याच घरात राहत होती. या घराचे सुमारे १५ लाख रुपये प्रति महिना भाडे होते. रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कतरिना वांद्रे इथल्या माऊंट मेरी चर्चजवळ असलेल्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली होती. मुंबईत स्वतःचे हक्काचे घर असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. तसंच स्वप्न कोट्यवधीची मालकीण असणाऱ्या कॅटचंही असावं. त्यामुळंच की काय लग्नानंतर तिने मुंबईत स्वतःचं घर खरेदी करत स्वप्न पूर्ण केले आहे.

टॅग्स :विकी कौशलकतरिना कैफ