Join us

या अभिनेत्रीने गरोदरपणात चक्क बिकनीत केले फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 9:05 AM

या अभिनेत्रीने गरोदरपणात बिकनीत फोटोशूट करण्याची ही काही पहिली वेळ नाही.

ठळक मुद्देया फोटोंमध्ये लिसा ब्लॅक बिकिनीमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत असून तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडन हिने फार कमी वेळात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. दीर्घकाळापासून कुठल्याही बॉलिवूड चित्रपटात ती झळकली नसली तरी ती सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. सध्या लिसा प्रेग्नंट आहे. लवकरच ती दुसऱ्यांदा आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने आई होणार असल्याची बातमी शेअर केली होती. आता तिने तिच्या बेबी बम्पचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत लिसा बिकिनीत दिसतेय.

लिसाने गरोदरपणात बिकनीत फोटोशूट करण्याची ही काही पहिली वेळ नाही. तिने याआधी देखील बिकनीत फोटोशूट करत फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. 

या फोटोंमध्ये लिसा ब्लॅक बिकिनीमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत असून तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. लिसाने या फोटोसोबत एक छानसे कॅप्शन देखील दिले आहे. तिने या फोटोसोबत आता कधीही... असे म्हणत तिच्या बाळाचा जन्म होण्याची तारीख जवळ आली असल्याचे तिच्या चाहत्यांना सांगितले आहे. 

लिसा नेहमीच पती डिनो लालवानी आणि मुलगा जॅक लालवानी यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये लिसा अखेरची दिसली होती. यात अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय, रणबीर कपूर आणि फवाद खान आदी मुख्य भूमिकेत होते.

मुळात लिजाने करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली होती. चेन्नईत जन्मलेली लिसा बरीच वर्षे विदेशात राहिलीय. आधी ऑस्ट्रेलिया, मग अमेरिकेत ती लहानाची मोठी झाली. यानंतर अभिनेत्री बनण्यासाठी तिने मुंबई गाठली. बॉलिवूडमध्ये ती आयशा, क्वीन, हाऊसफुल3, ऐ दिल है मुश्किल अशा अनेक सिनेमांत दिसली.

लिसाने ऑक्टोबर 2016 मध्ये तिचा बॉयफ्रेन्ड डिनो ललवानी याच्याशी लग्न केले होते. डिनो हा पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या ब्रिटीश व्यावसायिकाचा मुलगा आहे. त्यानंतर काही दिवसातच तिने पहिल्या प्रेग्नन्सीची माहिती दिली होती. लिसाने 17 मे 2017 मध्ये पहिल्या अपत्याला जन्म दिला होता. तिच्या पहिल्या मुलाचे नाव जॅक आहे.

टॅग्स :लीसा हेडन