गेल्या अनेक दिवसांपासून रणवीर सिंगचा ‘८३’ सिनेमा चर्चेत आहे.'८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. यात रणवीर सिंग कपील देव यांची भूमिका साकारणार आहे.दिग्दर्शक कबीर खान या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटातील कलाकारांची नावे जाहीर झाल्यानंतर आता निशांत दहिया देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. बलविंदर संधूने निशांत दहियाची निवड केली आहे.
निशांत दहिया '८३' चित्रपटात ऑल राउंडर रोजर बिन्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. याबाबत या चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट केलंय की, निशांत दहिया दिसणार रोजन बिन्नीच्या भूमिकेत. '८३' विश्वचषकातील प्रमुख विकेटटेकर.
रोजर बिन्नी एक ऑल राऊंडर खेळाडू होता आणि त्यांनी फलंदाजी आणि बॉलिंगमध्ये आपले कौशल्य दाखवले होते. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील कलाकारांनी धर्मशाळा येथे दिग्गज क्रिकेटपटूंकडून प्रशिक्षण घेतले होते.
पाच दिवसांच्या अभ्यास सत्र तीन दिवसांत समाप्त केल्यानंतर निशांत दहिया म्हणाला की, कलाकार आपल्या व्यक्तिगत पात्रांचे बारकावे समजून घेण्यासाठी लक्ष केंद्रीत करत आहेत. धर्मशालामध्ये नुकतेच इतर कलाकारांसोबत एक चांगल्या टीमसाठी ट्रेनिंग देण्यात आले. कपिल देव, मोंहिदर अमरनाथ, यशपाल शर्मा व मदन लाल यांसारख्या दिग्गज खेळांडूंकडून टीप्स मिळाले.
माजी क्रिकेटर बलविंदर संधू म्हणाले की, निशांत दहिया पंधरा दिवसांत शिकला. मला त्याच्यावर गर्व आहे. कबीर खानच्या चित्रपटासाठी अभिनेत्यांना मी ट्रेनिंग देत आहे.
पुढे निशांतने त्याच्या निवडीबद्दल सांगितले की, मी बॉल टाकला आणि बल्लू सरांनी सांगितले की, शानदार आणि तुझी निवड झाली.
'८३' चित्रपट १० एप्रिल, २०२० मध्ये प्रदर्शित होणार असून हिंदी, तमीळ व तेलगू या भाषांमध्ये रसिकांच्या भेटीला येणार आहे.