Join us

मालिकेच्या सेटवर अपघात झाल्याने निशिगंधा वाड रुग्णालयात दाखल, आता कशी आहे प्रकृती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 13:53 IST

'सुमन इंदोरी' या मालिकेच्या सेटवर निशिगंधा यांचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. 

Nishigandha Wad : मराठी कलाविश्वातील गुणी अभिनेत्री म्हणजे निशिगंधा वाड (Nishigandha wad). आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक दर्जेदार सिनेमांमध्ये काम केलं. त्यामुळे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सिनेमानंतर त्यांनी मालिकाविश्वातही आपला ठसा उमटवला आहे. सध्या त्या 'सुमन इंदोरी' या हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशातच या मालिकेच्या सेटवर निशिगंधा यांचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. 

निशिगंधा वाड यांचा 'सुमन इंदोरी' या मालिकेच्या सेटवर शूटिंगदरम्यान अपघात झाला आहे. अपघातानंतर त्यांना तातडीने  रुग्णालयात भरती करण्यात आले होतं.  'टाइम्स नाउ'नुसार शूटिंगमध्ये एका सीनदरम्यान त्या घसरल्या आणि त्यांच्या पायाला दुखापत झाली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना काही दिवसांसाठी आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

निशिगंधा वाड यांनीही हिंदी टेलिव्हिजनमधील एक प्रमुख चेहरा आहेत. 'ससुराल सिमर का', 'मेरी गुडिया', 'कभी कभी इत्तेफाक', 'रब से है दुआ' अशा अनेक लोकप्रिय हिंदी मालिकेत त्यांनी महत्त्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. 'सुमन इंदोरी'  या मालिकेत निशिगंधा सुमित्रा मित्तल हे पात्र साकरत आहे. सध्या या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. ही एक हृदयस्पर्शी कौटुंबिक मालिका आहे. 

 

टॅग्स :निशिगंधा वाड