Join us

दिल्लीहून मुंबईला आले, रात्री १० वाजता खोलीत गेले अन्...; नितीन देसाईंच्या आत्महत्येपूर्वी नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 2:22 PM

नितीन देसाईंच्या आत्महत्येपूर्वी नेमकं काय घडलं? बॉडीगार्डने सांगितला घटनाक्रम

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली आहे. कर्जतमधील एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास घेत त्यांनी जीवन संपवलं. त्यांच्या आत्महत्येने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.  सिनेसृष्टीतील कलाकारांनी नितीन देसाईंच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्येसारखं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्या आत्महत्येमागील नेमकं कारण काय, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

नितीन देसाई हे मंगळवारी(१ ऑगस्ट) रात्री दिल्लीहून विमानाने मुंबईला आले होते. रात्री १० वाजता ते कर्जतमधील एन.डी. स्टुडिओमध्ये ते रात्री गेले होते. सकाळी ते खोलीतून बाहेर न आल्याने त्यांच्या बॉडीगार्डने दरवाजा वाजवला. परंतु, आतून कोणतीच प्रतिसाद न मिळाल्याने खोलीच्या खिडकीतून त्यांनी डोकावून पाहिलं असता देसाईंचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. यानंतर लगेचच देसाईंच्या आत्महत्येबाबत त्यांच्या बॉडीगार्डने पोलिसांना कळवलं. नितीन देसाईंचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सकाळी ४.३० वाजल्याच्या सुमारास नितीन देसाईंनी आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

"मैत्री फक्त कामापुरती न ठेवता...", नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर प्रसिद्ध मराठी लेखकाची पोस्ट

'लगान' चित्रपटाचं शूटिंग करताना वडिलांना कॅन्सर झाल्याचं कळलं अन्...; नितीन देसाईंनी शेअर केलेला भावनिक प्रसंग

नितीन देसाईंनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी काम केलं होतं. अनेक सुपरहिट चित्रपटांसाठी नितीन देसाई यांनी सेट उभारले होते. नितीन देसाई यांनी 'लगान', 'देवदास', 'हम दिल दे चुके सनम', 'दौड', 'रंगीला' अशा अनेक सुपरहिट चित्रपटांसाठी दिग्दर्शन केलं होतं.  ८०च्या दशकापासून नितीन देसाई यांनी त्यांच्या कलाविश्वातील कारकीर्दीला सुरुवात केली होती. सुरुवातीला त्यांनी दूरदर्शनवरील 'तमस' मालिकेसाठी काम केलं होतं. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या '१९४२ : अ लव्ह स्टोरी' या विनोद चोप्रांच्या चित्रपटातून त्यांना पहिला ब्रेक मिळाला होता. या चित्रपटात अनिल कपूर, मोनिषा कोईराला, जॉकी श्रॉफ मुख्य भूमिकेत होते.

टॅग्स :नितीन चंद्रकांत देसाईबॉलिवूड