मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) सध्या मराठी मालिकांतून भेटीला येत असतात. 'अग्गबाई सासूबाई' या मालिकेतील त्यांची भूमिका गाजली. पण प्रश्न असा पडतो की इंडस्ट्रीत इतकी वर्ष काम करुन निवेदिता सराफहिंदी मालिका किंवा चित्रपटात फारशा दिसल्या नाहीत. त्यांनी काही काळासाठी एखादी हिंदी मालिका केली मात्र बऱ्याच ऑफर्स नाकारल्याही. याचं कारण त्यांनी नुकतंच एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.
निवेदिता सराफ म्हणाल्या, 'हिंदीत काम करण्यासाठी त्यांचं तसं मार्केटिंग करावं लागतं. त्यात कही बदल झालेला नाही. ते चुकीचंही नाही. म्हणून मी फार तिकडे गेले नाही. तेव्हा आपणच समोरुन काम मागायला जाणं कमीपणा वाटायचा. आता तसं काही राहिलं नाही. निर्माती शोभा कपूर यांनी स्वत: फोन करुन बोलावलं म्हणून मी सर्वगुण संपन्न ही मालिका केली.'
निवेदिता यांनी 1984 साली 'ये जो है जिंदगी','केसरी नंदन','सपनो से भरे नैना' या हिंदी मालिकांमध्ये काळ काम केलं होतं.तर 'किंग अंकल', 'सर आँखो पर', 'जायदाद' यासारख्या काही हिंदी सिनेमांमध्येही भूमिका साकारल्या. सध्या निवेदिता सराफ 'वाडा चिरेबंदी' या नाटकात व्यस्त आहेत. त्यामुळे सध्या त्यांनी मालिकांमधून ब्रेक घेतलाय.