गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये दिग्गज व्यक्तींवर बायोपिक येत आहेत. तर बायोपिकसाठी बरीचशी नावे चर्चेत येत असतात. तसेच मधुबाला व किशोर कुमार यांच्यावर बायोपिक येणार असल्याचं बोललं जातं होतं. प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग बसू हे बायोपिक बनवणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता समजतंय की मधुबाला व किशोर कुमार यांच्यावर बायोपिक बनणार नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग बसू गेल्या चार वर्षांपासून किशोर कुमार यांच्यावर बायोपिक बनवण्याचा विचार करत होते. रणबीर कपूर किशोर कुमार यांची भूमिका साकारणार होता. पण किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांच्या डोक्यात काहीतरी वेगळाच प्लान होता. त्यांनी वडिलांवर चित्रपट बनवताना प्रत्येक गोष्ट त्यांच्या संमतीने झाली पाहिजे. त्याशिवाय हा चित्रपट होऊ शकत नाही.
त्यांनी मधुबाला यांच्या बहिणीकडून परवानगी घेतली पण दुसऱ्या बहिणीने कायदेशीर त्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे त्यानेदेखील मधुबाला यांच्यावर बायोपिक करण्याचा विचार सध्यातरी थांबवलेला दिसतो आहे.