Join us

नो मेकअप लूकमध्ये अशी दिसते मृण्मयी देशपांडे, फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 17:25 IST

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिनेदेखील नो मेकअप लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

सध्या नो मेकअप सेल्फीचा ट्रेंड असून बॉलिवूडच्या बऱ्याच अभिनेत्री विनामेकअप फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. आता मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिनेदेखील नो मेकअप लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

मृण्मयी सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. सोशल मीडियावर ती फोटोही आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिचा असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरत आहे. कारण तिने नो मेकअप लूकमधील फोटो शेअर केला आहे.

नेहमी ग्लॅमरस दिसणाऱ्या मृणाल देशपांडे हिचा नो मेकअप लूक पाहून चाहते थक्क झाले. चाहत्यांनी तिच्या फोटोवर भरभरून कमेंट केली आहे. चाहत्यांनी तिला तू मुळातच सुंदर असल्याचं म्हटलं आहे. 

फर्जंद, फत्तेशिकस्त, कट्यार काळजात घुसली', नटसम्राट, 'स्लॅमबुक' चित्रपटात मृण्मयीने जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे.

'अग्निहोत्र', 'कुंकू' यासारख्या मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. विविध सिनेमातील अभिनयासह मृण्मयीने दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे.

टॅग्स :मृण्मयी देशपांडेफत्तेशिकस्त