मराठमोळी अभिनेत्री रुचिरा जाधव नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. सोशल मीडियावरही ती आपल्या चाहत्यांसाठी खास पोस्ट करत असते. त्यातच, यंदा बिग बॉसमराठीच्या चौथ्या सीजनमध्ये सहभागी झाल्याने तिचा फॅन फॉलोईंग वाढला आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटलाही आता चांगलाच चाहतावर्ग जोडला आहे. त्यामुळेच, तिची सोशल मीडियातील पोस्टही चर्चेत असते. नुकतेच तिने एक पोस्ट करत चाहत्यांची वाहवा मिळवली आहे. त्यामध्ये, तिने कुडाळच्या रेल्वे स्टेशनवरुन प्रवास केल्याचं दिसून येतं. रुचिरा गावाकडे गेली असता, परतीचा प्रवासही तिने रेल्वेनेच केला.
'बिग बॉसमराठी'चा ४ था सीजन धमाकेदार ठरला. यातील स्पर्धकांपैकी एक असलेल्या रुचिरा जाधवनेही चाहत्यांचं लक्ष वेधलं. शांत स्वभाव आणि दमदार खेळीच्या जोरावर रुचिराने प्रेक्षकांना भुरळ पाडली. अभिनेत्री रुचिरा सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. सध्या, विमानाचं तिकीट रद्द करुन तिने कुडाळ रेल्वे स्थानकावरुन केलेल्या फेव्हरेट प्रवासाची चर्चा होतेय. इंस्टाग्राम अकाऊंटवरुन रुचिराने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासोबत, एक पोस्टही लिहिली असून आपण विमानाचं तिकीट रद्द करुन आवडत्या कोकण रेल्वेनं प्रवास केल्याचं तिने म्हटले आहे.
'कोकण आणि Train चा प्रवास म्हणजे Fav समीकरण…जाताना flight ने गेले. परत येताना सुद्धा flight ticket booked होतं. पण कोकणातून लगेच पाय निघत नव्हता….☺️#ruchirasays आपलं कोकण आहेच तसं, मग काय… cancelled my ticket… अजून एक दिवस राहिले आणि next day Train ने आले'. अशी माहिती रुचिराने दिली. या व्हिडिओतील रुचिराचा ड्रेस, स्टाईल आणि हटके अंदाज पाहून चाहत्यांनाची ती पोस्ट जाम आवडली आहे. त्यामुळेच, चाहत्यांकडून रुचिराच्या या निर्णयाची वाहवा होत आहे.