आतापर्यंत सस्पेन्स - थ्रिलर चित्रपट बनविणाऱ्या दिग्दर्शक अब्बास- मस्तानच्या जोडीने या वेळी ‘किस किसको को प्यार करूं’ या चित्रपटाच्या निमित्ताने कॉमेडीचा प्रयोग केला आहे. टीव्हीवरील कॉमेडीचा स्टार म्हणून ओळखला जाणारा कपिल शर्मा नायकाच्या भूमिकेत आहे. तीन बायका अन् फजिती ऐका अशी या चित्रपटाची कथा आहे.कुमार शिव राम कृष्णा (कपिल शर्मा) हा मुंबईत राहत आहे. त्याच्याबाबतीत असे काही प्रसंग ओढवतात, की त्याला एकापाठोपाठ तीन मुलींशी विवाह करावा लागतो. जुही (मंजरी फडणीस), सिमरन (सिमरन कौर मुंडी) आणि अंजली (साई लोकूर) या तिघींशी तो लग्न करतो, तर दीपिका (एली अवराम) त्याची गर्लफ्रेंड आहे. आपल्या तीनही पत्नींसाठी तो एकाच बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेतो, जेणेकरून तिघींनाही तो वेळ देऊ शकेल. तीन पत्नी आणि एक गर्लफ्रेंड यांच्या चक्करमध्ये त्याचे आयुष्य घनचक्कर होऊन जाते. अशातच गावाकडून आलेली आई (सुप्रिया पाठक) व वडील (शरद सक्सेना) यांच्यामुळे प्रकरण आणखीच बिघडते. तीन बायकांचे हे प्रकरण अशी कलाटणी घेते की, या तिघी आणि दीपिका चांगल्या मैत्रिणी होतात. एके दिवशी कुमारचे भांडे फुटते आणि तो सांगतो, की कोणत्या परिस्थितीत त्याने हे पाऊल उचलले. का पाहावा ? : काही पर्याय नसेल तर; काही सीन्सवर हसण्यासाठी पाहायला हरकत नाही.का पाहू नये ? : कपिलच्या भूमिकेपासून ते कथानकापर्यंत सर्व काही प्रेक्षकांवर प्रभाव पाडू शकत नाही.वैशिष्ट्ये तीन पत्नींसोबतचे काही क्षण निश्चित हसायला लावतात. काही संवादही चांगले आहेत.
ना कथानक, ना कॉमेडी
By admin | Published: September 26, 2015 10:20 PM