Join us

जॉन अब्राहमसोबत पुन्हा एकदा दिसणार नोरा फतेही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 4:52 PM

'बाटला हाऊस' चित्रपटाची कथा भारतातील वादग्रस्त पोलीस अधिकारीवर आधारीत आहे.

ठळक मुद्दे'बाटला हाऊस' चित्रपट पुढील वर्षी १५ ऑगस्टला होणार प्रदर्शित

'परमाणु - द स्टोरी ऑफ पोखरण' चित्रपटानंतर अभिनेता जॉन अब्राहम पुन्हा एकदा सत्यघटनेवर आधारीत असलेल्या चित्रपटाचा भाग बनणार आहे. या सिनेमाचे नाव आहे 'बाटला हाऊस'. हा सिनेमा बाटला हाऊस एन्काउंटरवर आधारीत असून या चित्रपटात अभिनेत्री नोरा फतेही देखील दिसणार आहे. 

मोरक्कोवरून आलेली नोरा फतेही हल्ली चर्चेत आहे. जॉन अब्राहम अभिनीत सत्यमेव जयते चित्रपटात सुश्मिता सेनने दिलबर दिलबर या गाण्यावर  थिरकताना दिसली होती. या गाण्यातील डान्सला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता जॉन अब्राहम व नोता फतेही बाटला हाऊस चित्रपटात दिसणार आहे. यात ते दोघे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याबाबत निर्माता-दिग्दर्शक निखिल आडवाणी यांनी सांगितले की, 'आधीच्या सिनेमावेळी मला समजले की नोरा फक्त आयटम साँगच नाही तर तिला सिनेमाबद्दलही माहित आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस नोरा चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. 'नोराच्या नुसार 'बाटला हाऊस' सिनेमातील भूमिकेसाठी खूप तयारी करावी लागणार आहे. यासाठी तिला कार्यशाळेत सहभागी व्हावे लागणार आहे. नोराने स्त्री चित्रपटात एक आयटम साँग केले आणि आता ती सलमान खानच्या भारत चित्रपटात दिसणार आहे. 'बाटला हाऊस' चित्रपट पुढील वर्षी १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील जॉनचा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात जॉन संजीव कुमार यादव यांची भूमिका करताना दिसणार आहे. ज्यांनी बाटला हाऊस एन्काउंटरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.१३ सप्टेंबर २००८ साली दिल्लीतील करोल बाग, कनाट प्लेस, इंडिया गेट व ग्रेटर कैलाश येथे एकापाठोपाठ एक बॉम्बस्फोट झाले होते. या दुर्घटनेत २६ लोक मृत्यूमुखी पडले होते व १३३ लोक जखमी झाले होते. दिल्ली पोलिसांनी या बॉम्बस्फोटोसाठी दहशतवादी संघटना इंडियान मुजाहिद्दीनला जबाबदार धरले होते. या घटनेच्या सहा दिवसानंतर १९ सप्टेंबरला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची सूचना मिळाली होती की इंडियन मुजाहिद्दीन संघटनेटे पाच आंतकवादी बाटला हाऊसमधील एका घरात राहत आहेत. 'बाटला हाऊस' चित्रपट १५ ऑगस्ट, २०१९ला प्रदर्शित होणार आहे.  

टॅग्स :नोरा फतेहीजॉन अब्राहम