Bangladesh ने रद्द केला Nora Fatehiचा डान्स शो, समोर आलं यामागचं मोठं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 12:28 PM2022-10-19T12:28:22+5:302022-10-19T12:31:06+5:30

बांगलादेशची राजधानी ढाका येथे एका कार्यक्रमात परफॉर्म करण्यास सांगण्यात आले. मात्र, बांगलादेश सरकारने आता नकार देत शो रद्द केला आहे.

Nora Fatehi dance performance cancelled bangladesh government refuses spend dollars | Bangladesh ने रद्द केला Nora Fatehiचा डान्स शो, समोर आलं यामागचं मोठं कारण

Bangladesh ने रद्द केला Nora Fatehiचा डान्स शो, समोर आलं यामागचं मोठं कारण

googlenewsNext

आपल्या डान्स आणि स्टाइलने लाखो लोकांना वेड लावणारी अभिनेत्री नोरा फतेही(Nora Fatehi)  पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या एका डान्स इव्हेंटची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. हा डान्स इव्हेंट भारताच्या शेजारी असलेले बांगलादेशात होणार होता, तो आता तेथील सरकारने रद्द केला आहे. ढाका येथील हा कार्यक्रम डॉलर वाचवण्यासाठी रद्द करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

नोरा फतेही सध्या कलर्स वाहिनीवरील झलक दिखला जा 10 (Jhalak Dikhhla Jaa 10)या रिअ‍ॅलिटी शोची जज आहे. या अभिनेत्रीने आपल्या बेली डान्सने प्रेक्षकांना वेड लावले आहे. देशातच नाही तर परदेशातही तिचा चाहता वर्ग आहे. अलिकडेच तिला बांगलादेशची राजधानी ढाका येथे एका कार्यक्रमात परफॉर्म करण्यास सांगण्यात आले. मात्र, बांगलादेश सरकारने आता नकार देत शो रद्द केला आहे.

बांगलादेश सरकारच्या म्हणण्यानुसार त्यांनी हा शो रद्द केला आहे. डॉलर वाचवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. बांगलादेशच्या सांस्कृतिक मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात त्यांनी आपला निर्णय स्पष्ट करताना सांगितले की, सध्याची जागतिक परिस्थिती पाहता परकीय चलनाचा साठा राखण्याच्या उद्देशाने नोरा फतेही ता शो रद्द करण्यात आला आहे. वुमन्स लीडरशिप कॉर्पोरेशनच्या एका कार्यक्रमात नोरा परफॉर्म करणार होती.

नोरा फतेही बॉलिवू़डमधील सर्वात चांगल्या डान्सर्सपैकी एक मानली जाते. अनेक टीव्ही शोज, म्युझिक व्हिडीओ आणि सिनेमात ती दिसते. नोराने जितकीही गाणी केली ती सगळी सुपरहिट झाली. ज्यात 'मनोहरी', 'दिलबर', 'कमरिया', 'एक तो कम ज़िंदगानी', 'साकी-साकी', 'कुसू-कुसू' आणि 'हाय गर्मी' यांचा समावेश आहे.


 

Web Title: Nora Fatehi dance performance cancelled bangladesh government refuses spend dollars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.