वर्षाची सुरूवात स्ट्रीट डान्सर थ्रीडी चित्रपटाने केल्यानंतर आता अभिनेत्री व डान्सर नोरा फतेही आगामी चित्रपट भुजः द प्राइड ऑफ इंडियामध्ये झळकणार आहे. या चित्रपटात ती गुप्तहेरची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट १९७१ सालातील भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळावर आधारीत आहे. या चित्रपटातील अॅक्शन सीनसाठी नोराने मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये ट्रेनिंग घेतले आहे.
नोराने या चित्रपटाबाबत सांगितलं की, मी बेसिक गोष्टी शिकली आहे. ज्यात लाथ मारणे, मुक्का मारणे आणि खाली पाडणे आणि बंदुक चालवणे या गोष्टींचा समावेश आहे. ही एक परफॉर्मन्स ओरियंटेड भूमिका आहे आणि ही भूमिका माझ्या करियरला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवेल.