Join us

'ताल' सिनेमासाठी, ऐश्वर्या राय, अनिल कपूर आणि अक्षय खन्ना नव्हते सुभाष घईंची पहिली पसंती, या कलाकारांची झाली होती निवड पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 7:55 PM

जवळपास 21 वर्षांनंतरही 'ताल'ची जादू काही कमी झालेली नाही. आजही या सिनेमाचे कलाकार जिथं जातात तिथे ताल सिनेमाची आठवण नाही झाली तरच नवल.

सुभाष घई यांच्या क्लासिक ‘ताल’ सिनेमाला नुकतीच 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. ऐश्वर्या राय, अनिल कपूर आणि अक्षय खन्ना  यांचा अभिनय असेला 'ताल' सिनेमाने चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. 'ताल' हा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला. या सिनेमाची कथा, यातील कलाकारांचा अभिनय, सुभाष घई यांचे दिग्दर्शन, गाणी, संगीत  या सगळ्याच गोष्टींनी रसिकांची मनं जिंकली. सिनेमातील ऐश्वर्याने साकारलेली भूमिकेची जादू तर आजही रसिकांवर कायम आहे. याशिवाय 'ताल' सिनेमाची गाणी आजही रसिकांच्या ओठावर रूळतात. जवळपास 21 वर्षांनंतरही 'ताल'ची जादू काही कमी झालेली नाही. आजही या सिनेमाचे कलाकार जिथं जातात तिथे ताल सिनेमाची आठवण नाही झाली तरच नवल.

तुम्हाला माहिती आहे का, मुळात सिनेमात सुरूवातील सुभाष घई  ऐश्वर्या आणि अक्षय खन्नाच्या जागी शाहरुख खान आणि महिमा चौधरी यांना घेणार हाेते. मनीषा कोईरालादेखील यासाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र तिनेही या भूमिकेसाठी नकार दिला होता. त्यानंतर ऐश्वर्याला घेण्यात आले मात्र तोपर्यंत शााहरुखने काही कारणामुळे हा सिनेमा सोडला होता. शेवटी शाहरुखच्या जागी अक्षय खन्नाला घेण्यात आले.  अनिल कपूरच्या भूमिकेसाठी गोविंदाशी संपर्क करण्यात आला होता. मात्र गोविंदा नंतर अनिल कपूरच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

जेव्हा ऐश्वर्यासोबत सुभाष घई यांची सिनेमासाठी बोलणी सुरू होती तेव्हा, ऐश्वर्याला पाहताच सुभाष घई यांची तिच्यावरून नजर हटतच नव्हती.  ऐश्वर्याचं सौंदर्यावर सुभाष घई फुल फिदा झाले होते.  जेव्हा - जेव्हा ऐश्वर्याला भेटायचो तिलाच पाहत राहायचो.असेही अनेक मुलाखतींमध्ये सांगितले होते. तिला पाहताच  त्यांनी या भूमिकेसाठी ऐश्वर्याच फिट बसते असा विश्वासच होता. ऐश्वर्यानंतर कोणत्याही अभिनेत्रीचा त्यांनी या भूमिकेसाठी विचारच केला नाही. ऐश्वर्यासाठी देखील 'ताल' हा सिनेमा तिच्या आवडत्या सिनेमापैकी एक आहे. या भूमिकेसाठी ऐश्वर्याही खूप उत्सुक होती मुळात शूटिंगच्या पहिल्या दिवसापासूनच हा सिनेमा जादू करेल, रसिकांची पसंती मिळवेल असा विश्वास तिला होता. अगदी त्याचप्रमाणे  कलाकारांच्या मेहनतीचे चीज झाले आणि 'ताल' सिनेमा रसिकांची पसंती मिळवण्यात यशस्वी झाला.

टॅग्स :सुभाष घईऐश्वर्या राय बच्चन