मराठी कलाविश्वात अजरामर ठरलेला सिनेमा म्हणजे माहेरची साडी (Maherachi Sadi ) . १९९१ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. अलका कुबल (Alka Kubal) यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा आजही तितकाच आवडीने प्रेक्षक पाहतात. या सिनेमामुळे अलका कुबल यांच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. मात्र, या सिनेमासाठी अलका कुबल पहिली पसंती नव्हत्या. त्यांच्या ऐवजी बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीला हा सिनेमा ऑफर झाला होता.
मैंने प्यार किया या सिनेमामुळे रातोरात सुपरस्टार झालेली अभिनेत्री भाग्यश्री हिला सर्वात प्रथम माहेरची साडीसाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र, भाग्यश्रीने थेट या सिनेमासाठी नकार दिला. विशेष म्हणजे अलका कुबल यांना या सिनेमात घ्यावं अशी सिनेमाच्या टीमची जराही इच्छा नव्हती. मात्र, भाग्यश्रीच्या नकारामुळे अलका कुबल यांना घ्यावं लागलं. विशेष म्हणजे हा सिनेमा अलका कुबल यांच्या उत्तम अभिनयामुळे सुपरहिट झाला.
आर्चीसाठी रिंकूऐवजी 'या' अभिनेत्रीची झाली होती निवड; एका कारणामुळे तिने गमावला सिनेमा
चित्रपटाती लक्ष्मी या सोशिक भूमिकेसाठी विजय कोंडके यांना भाग्यश्री हवी होती. त्यासाठी त्यांनी वारंवार तिच्याशी संपर्कही केला होता. परंतु, काही कारणास्तव भाग्यश्रीने या सिनेमासाठी नकार दिला. भाग्यश्रीच्या नकारानंतर हा सिनेमा अलका कुबल यांना मिळाला.
कसा मिळाला अलका कुबल यांना सिनेमा
भाग्यश्रीच्या नकारानंतर या सिनेमात अलका कुबल यांना घेण्यासाठी एन.एस. वैद्य, पितांबर काळे यांनी विजय कोंडके यांना विनंती केली. त्यानंतर अलका कुबल यांच्या पदरात माहेरची साडी हा सिनेमा पडला.
दरम्यान, या सिनेमानंतर अलका कुबल यांचं नशीब चांगलंच पालटलं. या सिनेमानंतर त्यांना अनेक सिनेमांच्या ऑफर्स मिळाल्या. मात्र, त्यांचा माहेरची साडी या सिनेमानं प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. या सिनेमात त्यांच्यासोबत उषा नाडकर्णी, अजिंक्य देव, रमेश भाटकर, विजय चव्हाण, विक्रम गोखले अशी तगडी स्टारकास्ट झळकली होती.