Join us

स्वरा भास्करच नाही, आता कियारा अडवाणीही झाली ‘बोल्ड’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 8:47 AM

‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातील अभिनेत्री स्वरा भास्करवर चित्रीत ‘मास्टरबेशन’च्या सीनवरून प्रचंड वाद झाला होता. हा सीन देणा-या स्वरालाही लोकांनी धारेवर धरले होते. पण कदाचित ब-याच दिवसांपासून मेकर्सची नजर या विषयावर असावी.

मुंबई : ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातील अभिनेत्री स्वरा भास्करवर चित्रीत ‘मास्टरबेशन’च्या सीनवरून प्रचंड वाद झाला होता. हा सीन देणा-या स्वरालाही लोकांनी धारेवर धरले होते. पण कदाचित ब-याच दिवसांपासून मेकर्सची नजर या विषयावर असावी. म्हणून पुन्हा एकदा असा सीन चित्रीत करण्यात आला आहे आणि यावेळी अभिनेत्री कियारा अडवाणी हिने हा सीन दिला आहे.

 नेटफिक्सवर रिलीज झालेल्या ‘लस्ट स्टोरिज’मध्ये कियारा मास्टरबेशन करताना दिसतेय. अलीकडे या सीनबद्दल कियारा बोलली. ‘ करण जोहरने मला या सीनबद्दल सांगितले तेव्हा ‘कभी खुशी कभी गम’च्या गाण्याचा उल्लेख त्याने केला नव्हता. पण या सीनसोबत हे गाणे टाकले गेले आणि त्या सीनने कमाल केली,’ असे ती म्हणाली. हा सीन करताना संकोच वाटला का? असे विचारले असता तिने नकारार्थी उत्तर दिले. माझा करण जोहरवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही एक आयकॉनिक सीन चित्रीत केला. तो पाहताना मजेशीर व विनोदी आहे़ मला वाटते, या विषयावर चर्चा व्हायला हवी. ‘लस्ट स्टोरिज’मध्ये अनेक बेड सीन्सही आहेत. माझ्यासाठी हे अगदी वेगळे होते. अनेक सीन्स देताना मी सहज नव्हते. पण माझा को-अ‍ॅक्टर विकी कौशलने मला यात मदत केली. त्याच्या मदतीनंतर मी सहजपणे हे सीन्स दिलेत, असेही तिने सांगितले.

‘लस्ट स्टोरिज’ हा अनुराग कश्यप, जोया अख्तर, दिवाकर बॅनर्जी व करण जोहर यांनी दिग्दर्शित केलेल्या चार शॉर्टफिल्मचे संकलन आहे. केवळ नेटफ्लिक्सवर ही सीरिज रिलीज केली गेली आहे. लग्नापूर्वीचे अफेअर, लग्नानंतरचे अफेअर, लाँग डिस्टंट रिलेशनशिप आणि लिव्ह इन अशा अनेक बाबतीत पुरूष आणि महिलांच्या नात्यांत महिलांचा दृष्टिकोण यात मांडला गेला आहे.

कियाराने ‘फगली’ या चित्रपटाव्दारे या क्षेत्रात पदार्पण केले आहे. ‘धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात ती सुशांत सिंह राजपूतसोबत दिसली होती. 

 2009मध्ये आलेल्या आमीर खानचा ‘3 इडियट्स’ चित्रपट पाहून कियाराला तिच्या वडिलांनी अभिनय करायला परवानगी दिली होती. ‘धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट सोडला तर कियाराच्या चित्रपटाना बॉक्स आॅफिसवर फारसे यश मिळालेले नाही आहे. नुकताच आलेला तिचा ‘मशीन’ हा चित्रपट फ्लॉप झाला होता. सध्या कियारा एक सुपरहिट चित्रपटाच्या शोधात आहे.