शाहरुख खानसाठी गतवर्ष निराशाजनक ठरले. त्याचा गतवर्षी रिलीज झालेला ‘झिरो’ दणकून आपटला. त्यापूर्वी आलेले फॅन, रईस आणि दिलवाले आणि जब हॅरी मेट सेजल हे त्याचे सगळे सिनेमे आपटले. शाहरुखचा जब हॅरी मेट सेजल या चित्रपटाचा बजेट ९० कोटी रुपये इतका होता. पण बॉक्स आॅफीसवर चित्रपटाने केवळ ६४.३३ कोटी रुपये कमावले. फॅन, रईस आणि दिलवाले या चित्रपटांची गतही फार वेगळी नव्हती. त्यामुळे ‘झिरो’ शाहरुखसाठी महत्त्वाचा आहे. पण हा चित्रपटही फ्लॉप झाला. पण या अपयशामुळे हार मानेल तो किंगखान कुठला? शाहरूखने आता आपल्या नव्या चित्रपटाची तयारी सुरु केली आहे.या चित्रपटाचे नाव आहे ‘सॅल्यूट’. या चित्रपटाचे शूटींग यावर्षी मे महिन्यात सुरु होणार होते. पण काही कारणास्तव येत्या फेबु्रवारीपासूनचं याचे शूटींग सुरू करण्याचा निर्णय किंगखानने म्हणे घेतला आहे. या चित्रपटात करिना कपूर शाहरुखची हिरोईन असणार, असे मानले गेले होते. पण आता एक ताजी बातमी आहे. होय, चित्रपटाचे निर्माता करिनाऐवजी फातिमा सना शेखला कास्ट करू इच्छितात, असे कळतेय.
फातिमा सना शेखचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ही बॉक्सआॅफिसवर कमाल दाखवू शकला नाही. पण तिच्या या चित्रपटातील अभिनयाने मात्र अनेकांना इंम्प्रेस केले. हे कारण आहे की, ‘सॅल्यूट’चे निर्मात्यांनी तिच्या नावावर विचार चालवला आहे.