Join us

KKR नव्हे तर 'ही' टीम होती शाहरुख खानची पहिली पसंती, ललित मोदींचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 15:14 IST

आज IPL 2025 साठी खेळाडूंच्या ऑक्शनला सुरुवात होणार आहे. त्यानिमित्त जाणून घ्या हा खास किस्सा

आयपीएल २०२५ मेगा लिलाव प्रक्रियेला अवघ्या काहीच तासांमध्ये सुरुवात होईल. सौदी अरेबियातील जेद्दाह या शहरात आज आणि उद्या हा भव्य लीलाव आयोजित करण्यात येणार आहे.या लिलावात IPL मधील १० फ्रँचायझी संघ ५७७ खेळाडूंवर बोली लावतील.  दुपारी ३ वाजल्यापासून या मेगा लिलावाला सुरुवात होणार आहे. यानिमित्ताने ललित मोदींनी KKR  चा मालक शाहरुख खानची पहिली पसंती 'कोलकाता नाईट रायडर' नसून कोणता संघ होता, याचा खास खुलासा केलाय.

हा संघ होता शाहरुखची पहिली पसंती

राज शमानी यांच्या एका पॉडकास्टमध्ये ललित मोदींनी सांगितलं की, सुरुवातीला  कोलकाता नाईट रायडर्स नाही तर मुंबई आणि अहमदाबादची टीम खरेदी करण्याचा शाहरुखचा प्रयत्न होता. परंतु कमी बोली लावल्याने शाहरुखला मुंबईची टीम खरेदी करता आली नाही. पुढे अंबानींनी 'मुंबई इंडियन्स'ला खरेदी केलं. आणि शाहरुखच्या वाट्याला 'कोलकाता नाईट रायडर्स' ही टीम मिळाली.

ललिल मोदींनी पुढे खुलासा केला की, शाहरुखने ७०-८० मिलियन इतरी बोली लावली होती. परंतु इतरांनी १०० मिलियन बोली लावल्याने शाहरुखला मुंबईची टीम खरेदी करता आली नाही. कोलकाता टीमसाठी शाहरुखने लावलेली ८५-८७ मिलियन बोली यशस्वी झाली. अशाप्रकारे शाहरुख कोलकाता संघाचा मालक झाला. २०१२, २०१४ आणि २०२४ मध्ये 'कोलकाता नाईट रायडर' संघाने IPL चा किताब जिंकला आहे.

टॅग्स :शाहरुख खानकोलकाता नाईट रायडर्सआयपीएल २०२४ललित मोदी