Join us

शिल्पा शेट्टीच नाहीतर 'या' अभिनेत्रींनाही नवऱ्यांमुळे सहन करावा लागला मनस्ताप, कोण आहे त्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 10:47 AM

दिसंत तस काही नसतं असेच काहीसे चंदरी दुनियेबद्दल म्हणावं लागेल, गेल्या काही दिवसांपासून राज कुंद्रा पॉर्न व्हिडीओ प्रकरणी अभिनेत्री ...

दिसंत तस काही नसतं असेच काहीसे चंदरी दुनियेबद्दल म्हणावं लागेल, गेल्या काही दिवसांपासून राज कुंद्रा पॉर्न व्हिडीओ प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीची जास्त चर्चा होत आहे. पती राज कुंद्रामुळे शिल्पा शेट्टी अडचणीत येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.पण तुम्हाला माहिती आहे का शिल्पा शेट्टी आधीही असे काही सेलिब्रेटी आहे ज्यांना नवऱ्यांमुळे मनस्ताप त्रास सहन करावं लागला आहे.

निशा रावल

नुकतेच एख कपल प्रचंड चर्चेत आले होते. घरगुती हिंसाचाराच अभिनेत्रीने आरोप करत अभिनेता करण करण मेहरा विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. करणचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचा दावा त्याची पत्नी निशा रावलने केला होता. करणने निशाने लावलेले आरोप खोटे असल्याचे सांगत स्पष्टीकरण दिले होते. करण मेहरा आणि निशा रावल या दोघांचे प्रकरणही प्रचंड गाजले होते. निशाने तर मीडियासमोर करण मेहराचे सगळे कारनामे उघड करत त्याचा खरा चेहरा जगासमोर आणला होता. करण मेहराच्या चाहत्यांनाही हे प्रकरण कळल्यानंतर आश्चर्याचा धक्काच बसला होता.

जरीना वहाब

 

आदित्य पांचोली आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्या वादाचीही प्रचंड चर्चा झाली होती. हा वाद जुना असला तरी आदित्य पांचोलीची प्तनी जरीना वहाबला ही नव-यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. जरीनालाही नव-यामुळे नको त्या टीकेचा सामना करावा लागला होता. 

दिव्या कुमार खोसला

अभिनेत्री दिव्या कुमार खोसलाचे लग्न टी- सीरिजचे हेड भूषण कुमारवर यांच्यासोबत झाले आहे. मध्यंतरी भूषण कुमार यांच्यावरही  एका मॉडेलनं बलात्काराचा आरोप केला होता. भूषण कुमार यांनी मॉडेलने केलेले आरोप खोटे असल्याचे सिद्ध केले होते. तरीही दिव्या कुमार खोसलाही अडचणीत आली होती. 

सुझान खान

बॉलिवूडचा मोस्ट हँडसम अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान या दोघांचा घटस्फोट झाला तेव्हा चाहत्यांनाही आश्चर्य वाटले होते. कारण दोघांचेही लव्हमॅरेज होते. हृतिक रोशन कंगणा राणौत आणि अभिनेत्री व मॉडल बार्बरा मोरीसोबत अफेअर असल्याचे बोलले गेले होते. त्यावेळी सुझान खानला हृतिकने धोका दिला आहे असे सुझानवा वाटु लागले होते. याच कारणामुळे सुझानने हृतिक रोशनला घटस्फोट देत वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. 

मदालसा शर्मा

मदलसा शर्माचाही काही वेगळा अनुभव नाही. मदालसाने मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षय चक्रवर्तीसोबत लग्न कलेे आहे. त्याच्यावरही  एका अभिनेत्रीनं बलात्कार केल्याचा आरोप लावला होता. पण नंतर अभिनेत्या हे आरोप खोटे असल्याचं म्हटलं होतं. 

टॅग्स :शिल्पा शेट्टीदिव्या कुमार