Join us

मोहरा या चित्रपटात रवीना टंडन नव्हे तर ही प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार होती मुख्य भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 15:20 IST

मोहरा या चित्रपटासाठी दिग्दर्शक राजीव राय यांची पहिली पसंती रवीनाला नव्हती.

ठळक मुद्देमोहरा या चित्रपटासाठी दिग्दर्शक राजीव राय यांची पहिली पसंती दिव्याला होती. तिने हा चित्रपट साईन केला होता आणि या चित्रपटातील काही दृश्यांचे तिने चित्रीकरण देखील केले होते. पण दिव्याच्या अपघाती निधनामुळे या चित्रपटाच्या टीमला चांगलाच धक्का बसला होता.

अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचा मोहरा हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील टीप टीप बरसा पाणी हे गाणे आजही लोकांच्या ओठावर रुळलेले आहे. या चित्रपटातील अक्षय आणि रवीनाची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. या चित्रपटातील रवीनाच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. पण तुम्हाला माहीत आहे का, या चित्रपटात रवीनाच्या ऐवजी एक दुसरीच अभिनेत्री मुख्य भूमिकेत होती. पण या अभिनेत्रीचे अचानक निधन झाल्यामुळे या चित्रपटात रवीनाला घेण्यात आले.

दिव्या भारतीने खूपच कमी वर्षांत बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले होते. तिच्या सौंदर्यावर तिचे चाहते फिदा होते. एवढेच नव्हे तर तिच्या अभिनयाला देखील सगळेच दाद देत असत. तिने अनेक हिट चित्रपट दिले असल्यामुळे तिच्यासोबत काम करण्याची सगळ्याच दिग्दर्शक, निर्मात्यांची इच्छा असायची. त्यामुळे दिव्या एका वेळी अनेक चित्रपट साईन करायची. दिव्याचे निधन झाले, त्यावेळी देखील तिने अनेक चित्रपट साईन केलेले होते. काही चित्रपटांच्या तर चित्रीकरणाला देखील सुरुवात झालेली होती. अशाच चित्रपटांमध्ये मोहरा हा चित्रपट देखील होता. 

मोहरा या चित्रपटासाठी दिग्दर्शक राजीव राय यांची पहिली पसंती दिव्याला होती. तिने हा चित्रपट साईन केला होता आणि या चित्रपटातील काही दृश्यांचे तिने चित्रीकरण देखील केले होते. पण दिव्याच्या अपघाती निधनामुळे या चित्रपटाच्या टीमला चांगलाच धक्का बसला होता. राजीव राय नवीन अभिनेत्रीच्या शोधात असताना त्यांनी रवीना टंडनचा विचार केला. त्यावेळी रवीना आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. तिचा दिलवाले हा चित्रपट चांगलाच गाजला होता. रवीनाने देखील मोहरा या चित्रपटातील भूमिकेला योग्य न्याय दिला. 

दिव्या केवळ नववीत असताना तिला चित्रपटाच्या ऑफर यायला लागल्या होत्या. तिला याच क्षेत्रात करियर करायचे असल्याने तिला याबाबत तिच्या कुटुंबियांना विचारले आणि खूपच कमी वयात तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दिव्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. पण त्याचसोबत तिला अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते.  

टॅग्स :रवीना टंडनदिव्या भारती