'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. उद्या २२ मार्चला संपूर्ण भारतभरात सिनेमा रिलीज होतोय. रणदीप हूडा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. अशातच 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाच्या टीमकडून एका मोठ्या चुकीची दुरुस्ती करण्यात आलीय. काल सिनेमात नेताजी बोस यांच्या भूमिकेत मराठमोळे अभिनेते सचिन पिळगावकर झळकणार अशी पोस्ट व्हायरल झाली. पण आता मात्र सचिन पिळगावकर नाही तर वेगळाच अभिनेता नेताजी बोस यांच्या भूमिकेत झळकल्याचा खुलासा झालाय.
'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाच्या टीमने काही तासांपुर्वी एक पोस्ट शेअर केली. यात नेताजी बोस यांच्या भूमिकेत अभिनेते ब्रजेश झा झळकणार असल्याचा खुलासा झाला. ब्रजेश झा यांच्या भूमिकेतला फोटो टीमने पोस्ट केला आहे. त्याआधी सचिन पिळगावकर यांचं नाव असलेली पोस्ट डिलीट करण्यात आली आहे. त्यामुळे सचिन पिळगावकर नव्हे तर ब्रजेश झा सिनेमात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेत झळकणार आहेत.
'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा २२ मार्चला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सिनेमात रणदीप हूडा, अंकीता लोखंडे, अमित सियाल हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. रणदीप हूडानेच 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाच्या दिग्दर्शनाची धूरा सांभाळली आहे. याशिवाय राजेश खेरा सिनेमात महात्मा गांधींची भूमिका साकारणार आहेत. सिनेमात गांधी विरुद्ध सावरकर यांच्यातला वैचारीक संघर्षही पाहायला मिळेल.