Join us

आता खिलाडी अक्षय कुमार बांधतोय शौचालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2017 1:07 PM

अक्षय कुमारने आता शौचालय बांधण्याचं काम हाती घेतले आहे. कुठे सुरू आहे बांधकाम???

ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 1 - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी सिनेमा "टॉयलेट एक प्रेम कथा"च्या शुटींग आणि प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. असे असतानाही अक्षय आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून समाजसेवा करण्याची एकही संधी सोडत नाही.  
 
आता तो अशा एका कामात गुंतला आहे की ते ऐकून तुम्हाला कदाचित खात्री होणार नाही.  सध्या खिलाडी अक्की शौचालय बांधण्यासाठी स्वतः खोदकाम करत आहे. 
 
अक्षय सोशल मीडियावर यासंबंधीचे फोटोही शेअर केले आहेत. मध्य प्रदेशातील खरगौन जिल्ह्यातील तो मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यासोबत शौचालय बांधण्यासाठी काम करत आहेत. शौचालयाच्या बांधकामासाठी त्याने स्वतः खोदकामही केले. 
देशात स्वच्छता राखण्यासाठी आणि स्वच्छता अभियानासाठी अक्षयने केलेले हे पहिले काम नाही. यापूर्वीही त्यानं अनेकदा या अभियानांर्तगत जनजागृती करण्याचे काम केले आहे. 
(शहिदांच्या कुटुंबीयांना मदत करणा-या अक्षय कुमारचे राजनाथ सिंहांनी मानले आभार)
(नक्षलवादी हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांना अक्षयकडून मदत)
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत
समाजसेवा, देशभक्ती, माणुसकी जपणारा अभिनेता अशी अक्षय कुमारची ख्याती आहे. काही दिवसांपूर्वी अक्कीनं छत्तीसगडमधील सुकुमा येथे नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली. सुकुमा येथे 11 मार्च रोजी माओवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 12 जवान शहीद झाले होते. या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना अक्षय कुमारने 9 लाखांची मदत दिली आहे. त्यानं केलेल्या आर्थिक मदतीबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्याचे आभार मानले आहेत.