Join us

अब दंगल होगा ! "दंगल"ने नावावर केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड

By admin | Published: June 14, 2017 1:13 PM

"दंगल"ने असा एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे, जो जगभरातील फक्त चार चित्रपटांना करणं शक्य झालं आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमीर खानच्या दंगल चित्रपटाची यशस्वी घोडदौड काही थांबायचं नाव घेताना दिसत नाही. चित्रपट यशाचे शिखर गाठत असून एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. चीनमध्ये रिलीज झाल्यानंतर "दंगल"ने तुफानी कमाई केली आणि एकामागोमाग एक रेकॉर्ड आपल्या नावे केले. मात्र नुकताच चित्रपटाने असा एका रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे, जो जगभरातील फक्त चार चित्रपटांच्या नावे आहे. 
 
(श्वाई ज्याओ बाबा)
(चीनमुळे "दंगल"च ठरला "बाहुबली")
("दंगल"ला मुकणार पाकिस्तान, आमिरचा देशभक्तीसाठी कठोर निर्णय)
 
चीनमध्ये ‘श्वाई ज्याओ बाबा’ (लेट्स रेसल डॅड) नावाने दंगल चित्रपट तब्बल सात हजार स्क्रिन्सवर रिलीज करण्यात आला. चित्रपट रिलीज झाल्यापासून चीनमध्ये तुफान कमाई करत असून सर्व शो हाऊसफुल्ल जात आहेत. 5 मे रोजी चीनमधील चित्रपटगृहांमध्ये रिलीज झालेल्या "दंगल" चित्रपटाने जगभरात तब्बल 301 मिलिअन डॉलर्स म्हणजे जवळपास 1932 कोटींची कमाई केली आहे. या कमाईसोबत दंगलने अनेक नवे रेकॉर्ड केले आहेत. मात्र "दंगल"ने असा एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे, जो जगभरातील फक्त चार चित्रपटांना करणं शक्य झालं आहे. 
 
जगभरात हॉलिवूड चित्रपटांचा दबदबा असून हे चित्रपट सर्वात जास्त कमाई करत असतात. मात्र फार कमी वेळा इंग्रजी भाषेत नसणारे चित्रपट इतकी मोठी कमाई करतात. अशा रितीने 300 मिलिअन डॉलर्सची कमाई करणारा "दंगल" जगभरातील पाचवा चित्रपट ठरला आहे. याआधी चीनमधील दोन, फ्रान्सचा एक आणि जपानाच्या एका चित्रपटाने हा रेकॉर्ड केला आहे. अशाप्रकारे या जागतिक विक्रम करणा-या चित्रपटांच्या यादीत "दंगल"ने पाचव्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. 
 
इंग्रजी भाषेत नसूनही जागतिक विक्रम करणारे पाच चित्रपट - 
द मरमेड (चीन)  553 मिलिअन डॉलर्स 
द इनटचेबलस (फ्रान्स)  427 मिलिअन डॉलर्स 
मॉन्स्टर हंट (चीन)  386 मिलिअन डॉलर्स 
योर नेम (जपान)  354 मिलिअन डॉलर्स 
दंगल (भारत) 301 मिलिअन डॉलर्स