बऱ्याच महिन्यांच्या ब्रेकनंतर आता पुन्हा तुमचा आवडता 'द कपिल शर्मा शो' सुरू झाला. महत्वाची बाब म्हणजे तुम्ही सुद्धा आता घरबसल्या तुमच्या या आवडत्या शो चा भाग होऊ शकता. तुम्हाला जर या शो भाग व्हायचा असेल तर त्यासाठी काय करावं लागेल याची माहिती स्वत: कपिल शर्माने दिली आहे. या माहितीचा व्हिडीओ कपिलने शेअर केला आहे.
या व्हिडीओ कपिल शर्माने सांगितले की, सोशल डिस्टंसिंगमुळे द कपिल शर्मा शोमध्ये नेहमीप्रमाणे ऑडियन्स दिसणार नाही. त्यामुळेच घरी बसलेल्या लोकांना शो चा भाग बनवलं जाणार आहे. यासाठी तुम्हाला फारच सोपं काम करायचं आहे. तुम्हाला एक १० ते १५ सेकंदाचा व्हिडीओ तयार करायचा आहे. ज्यात तुमचं नाव, शहर, वय आणि तुम्ही काय काम करता हे सांगायचं आहे.
नंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून कपिल शर्माला टॅग करावं लागेल. हे केल्यावर कपिल शर्मा शो ची टीम तुमच्याशी संपर्क करेल आणि शोसाठी व्हिडीओ कॉलने तुमच्याशी संवाद साधेल. जेव्हा एपिसोड ऑनएअर होईल तेव्हा तो व्हिडीओ दाखवला जाईल. जो सगळ्यांना बघायला मिळेल. म्हणजे तुम्हाला घरबसल्या टीव्हीवर झळकण्याची संधी मिळणार आहे.
दरम्यान कपिल शर्मा शो ची शूटींग फारच उशीरा सुरू झाली. कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे तीन महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी शूटींग बंद होती. आता कपिल शर्मा शो चा प्रोमो समोर आला आहे. ज्यात कपिल, कृष्णा अभिषेक, भारती मस्ती करताना दिसत आहे. पण कोरोनामुळे शो चा फॉर्मॅट बदलला आहे.