Join us  

हैदराबाद महापालिकेच्या वेबसाईटवर 'न्यूड' सनी लिओनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2016 12:43 PM

बॉलिवूडमधील अभिनेत्री सनी लिओनीचा ' न्यूड' फोटो सोमवारी हैदराबाद महापालिकेच्या वेबसाईटवर झळकल्याने मोठी खळबळ उडाली.

ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. २६ - पॉर्नस्टार ते बॉलिवूडमधील अभिनेत्री असा प्रवास करणारी सनी लिओनीचा ' न्यूड' फोटो सोमवारी हैदराबाद महापालिकेच्या वेबसाईटवर झळकल्याने मोठी खळबळ उडाली. मुख्य म्हणजे तांत्रिक विभागातील कर्मचा-यांना वेबसाईटवरून ते छायाचित्र तातडीने काढून टाकण्यात अपयश आल्याने अधिका-यांवर नामुष्कीची वेळ आली. ब-या प्रयत्नानंतर अखेर सोमवारी संध्याकाळी तो फोटो साईट्सच्या विविध सेक्शनमधून काढून टाकण्यात आला. 
सोमवारी सनीचा हा फोटो सर्वात प्रथम ग्रेटर हैदराबाद महापालिकेच्या कचरा गोळा करण्याच्या घंटागाडीची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रिअल टाईम साईटवर दिसायला लागले होते. याची माहिती मिळताच तत्काळ तांत्रिक विभागाकडे तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर तांत्रिक विभागातील अधिका-यांनी 'तो' फोटो साईटवरून काढून टाकला खरा मात्र थोड्याच वेळात तोच फोटो महापालिकेच्या इतर पेजेसवर दिसू लागला आणि एकच खळबळ उडाली. त्या सर्व पेजेसवरून हा फोटो काढून टाकण्यासाठी तांत्रिक विभागातील कर्मचा-यांना खूप प्रयत्न करावे लागले. अखेर सोमवारी संध्याकाळी उशीरा पालिकेच्या वेबसाईटवरून काढण्यात यश आले.
‘दरम्यान पालिकेची साईट हॅक करण्यात आली की पालिकेतील कोणा कर्मचा-यानेच साईटशी छेडाछाड करून हा फोटो अपलोड केला हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रारही दाखल करण्यात आलेली नाही. 'सेंटर फॉर गूड गव्हर्नन्स’कडून ही साईट सांभाळली जाते.