बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ (Nusrat Jahan) मागील काही दिवसांपासून त्यांच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत आहेत. नुसरत जहाँ यांनी २६ ऑगस्टला बाळाला जन्म दिल्यानंतर अनेकांनी त्यांना ट्रोल केलं. यामध्येच त्यांचा घटस्फोट आणि अभिनेता यश दासगुप्तासोबत (Yash Dasgupta) असलेल्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. विशेष म्हणजे सध्या सोशल मीडियावर यश आणि नुसरत यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोकडे पाहिल्यानंतर या दोघांनी लग्न केलं की काय असा प्रश्न चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे.
काही दिवसांपूर्वीच नुसरत आणि यश यांनी त्यांच्या मुलाचा यीशानचा वाढदिवस सेलिब्रेट केला. यावेळी नुसरत यांनी यश आणि बर्थ डे केकसोबत काही फोटो शेअर केले होते.
नुसरत यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये याशीनच्या वाढदिवसाचा केक दिसून येत आहे. या केकवर हसबँड आणि डॅड असं लिहिलं आहे. सोबतच हॅप्पी बर्थ डे माय लव असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष तिच्या पोस्टकडे वळलं आहे. या केकवर हसबँड लिहिल्यामुळे नुसरत व यशने लग्न केला का असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत यश व नुसरत यांनी त्यांच्या नात्यावर भाष्य केलं होतं. 'आमचं लग्न झालंय की नाही हे लोकांना माहित आहे का? आम्ही प्रत्येक गोष्ट उघडपणे सांगत नसलो तर त्याचा अर्थ असा नाही की, ज्या चर्चा होतायेत त्याच खऱ्या आहेत.आम्ही प्रत्येक गोष्टीची घोषणा हातामध्ये पोस्टर घेऊन करु शकत नाही', असं ते या मुलाखतीत म्हणाले होते.