Join us

तब्बल आठ वर्षांनंतर करण खन्ना आणि नीरा बॅनर्जी या मालिकेत करणार नृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 13:35 IST

एका पार्टीच्या प्रसंगात करण आणि दिव्या एकत्र नृत्य करताना तब्बल आठ वर्षांनी दिसतील.

करण खन्ना आणि नीरा बॅनर्जी हे कलाकार सध्या ‘स्टार प्लस’वरील ‘दिव्य दृष्टी’ मालिकेत अनुक्रमे शिखर आणि दिव्या यांच्या भूमिका रंगवीत आहेत. मालिकेत दिसणाऱ्या या दोघांमधील निकटच्या नात्याची प्रेक्षक आणि चाहत्यांकडूनविशेष प्रशंसा होत आहे.  मालिकेच्या आगामी एका भागात या दोघांना आपल्या नृत्य करताना दिसणार आहेत.

करण आणि नीरा  यांच्यातील मैत्रीचे रहस्य या दोघांना असलेल्या नृत्याच्या आवडीत आहे. याला योगायोग समजा किंवा अन्य काही,  पण नृत्यामुळेच हे दोघे प्रथम एकमेकाला भेटले आणि त्यांच्यात दृढ मैत्री झाली. आता ‘दिव्य दृष्टी’तील एका पार्टीच्याप्रसंगात करण आणि दिव्या एकत्र नृत्य करताना तब्बल आठ वर्षांनी दिसतील. आठ वर्षांनंतर आपल्याला पुन्हा एकत्र नृत्य करण्याची संधी मिळत असल्याचे ऐकल्यावर हे दोघे जुन्या आठवणींमध्ये रममाण झाले.

त्यांना हा प्रसंग नेमका काय आहे, ते दोन दिवसांतच समजले आणि तो त्यांनी अतिशय अप्रतिम रंगविला. करण स्वत: कुशल आणि प्रशिक्षित नर्तक असल्याने त्याने हा नृत्यप्रसंग अतिशय भव्य वाटावा, यासाठी स्वत:च्या काही सूचना केल्या.

करण म्हणाला, “मला जेव्हा सांगण्यात आले की मला या प्रसंगात नृत्य करायचे आहे, तेव्हा मी अतिशय आनंदित झालो. कारण नृत्यावर माझे विलक्षण प्रेम आहे. मला माझे नृत्यकौशल्य सादर करण्याची संधी मिळणार असल्याने मी खूपचउत्साहित झालो होतो. दुसरे असे की नीरा आणि मी आम्ही चांगले मित्र असून त्यामुळे या नृत्यात आमच्यातील सामंजस्य आपोआपच दिसून येईल, हे उघडच होते. आता प्रेक्षकांनाही या प्रसंगातील आमचं सामंजस्य पाहायला आवडेल, अशीआशा आहे.”

‘एबीसीडी-2’ चित्रपटातील ‘सुन साथिया’ या गाण्यावर करण आणि नीरा नृत्य सादर करणार असून त्यातील त्यांचा दमदार डान्स व केमिस्ट्री पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :दिव्य दृष्टी